SHE Marts Yojana 2026 Detail In Marathi : भारतामध्ये आजही अनेक महिला आहेत ज्या घरबसल्या छोटा व्यवसाय करतात पण त्या महिलांना योग्य बाजारपेठ मिळत नाही जसे लोणच, पापड बनवने, कपडे शिवणे वअशा प्रकारचे छोटे व्यवसाय महिला करतात परंतु हा व्यवसाय त्यांचा मर्यादित असतो हीच अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने बजेट 2026 मध्ये SHE Marts Yojana 2026 जाहीर केलेली आहे.
तर SHE Marts योजना काय आहे ? घरबसल्या महिलांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार? अशा प्रकारची या योजनेची संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत .
Table of Contents
About SHE Marts Yojana 2026
भारतातील ग्रामीण भागातील महिलांकडे व्यवसाय करण्याचे कौशल्य आहे परंतु विक्री साठी मार्केट नसल्यामुळे गावांमध्ये तयार होणारे उत्पादने शहरांमध्ये पोहोचता येत नाही या बाबीवर सरकारने लक्ष देत SHE Marts Yojana 2026 सुरू केलेली आहे या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना थेट बाजारांशी जोडले जाणार आहे.
या योजनेत महिला महिला स्वयं-सहायता गट (SHG) महत्वाची भूमिका बजावणार आहेत गटांमध्ये तयार होणारे उत्पादने एकाच ठिकाणी म्हणजे SHE Marts मध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले जाईल त्यामुळे महिलांना चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळेल.
SHE Marts कसे काम करणार ?
SHE Marts हे कसे काम करणार याबाबत आपण थोडक्यात समजून घेणार आहोत SHE Marts हे दुकानं महिला स्वयं-सहायता गटाच्या मालकीचे मार्केट असेल
- या ठिकाणी महिला स्वतः SHE Marts चालवतील
- उत्पादनाची विक्री, नोंदणी सर्व व्यवहार महिलाच पाहतील
- सरकारकडून महिलांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाईल
त्याचप्रमाणे काही SHE Marts ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी जोडले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे महिलांचे उत्पादने राज्याबाहेरी विकली जाऊ शकतात.
SHE Marts मध्ये कोणती उत्पादने विकता येते ?
या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनावर कोणते खडक मर्यादा राहणार नाही व महिलांनी तयार केलेली खालील सर्व उत्पादने SHE Marts मध्ये विकली जातील.
- पापड, लोणचं. मसाले
- हस्तकला, शोभेच्या वस्तू
- साड्या. कपडे
- कृषी आधारित उत्पादने
- नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने
महिलांना SHE Marts Yojana गेम चेंज करणार
लहान व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरणार आहे महिलांना सर्वात मोठी अडचण असते मार्केटिंग SHE Marts Yojana हिअडचणतात थेट सोडवत आहे या योजनेमुळे महिलांना दलालाशिवाय विक्री करता येईल, नफा थेट महिलांच्या हातात येईल, महिलांना व्यवसाय वाढण्याचा आत्मविश्वास मिळेल त्याचप्रमाणे ही योजना महिलांना कामगार नाही तर उद्योजक बनवणार आहे.
SHE Marts योजनेमुळे उत्पन्न कसे वाढेल ?
महिलांनी तयार केले उत्पादन जेव्हा थेट विकली जाईल तेव्हा महिलांना नफा जास्त मिळतो SHE Marts योजनेतील महिलांना योग्य दर मिळेल, उत्पादनाची ब्रॅण्डिंग होईल आणि ग्राहकाचा थेट संपर्क मिळेल यामुळे अनेक महिलांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
महिलांसाठी ही योजना कशी फायदेशीर आहे ?
देशातील अनेक महिला आपले घर सांभाळून छोटा व्यवसाय करतात पण बाहेर दुकान चालवणे त्यांना शक्य नसतं SHE Marts योजनेत महिलांना घरून उत्पादने तयार करता येतील विक्रीची जबाबदारी Marts घेईल व महिलावर अतिरिक्त तान येणार नाही म्हणूनच ही योजना घर सांभाळून काम करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला कसा फायदा देईल
SHE Marts योजनेमुळे ग्रामीण महिलांचे उत्पन्न वाढेल तेव्हा संपूर्ण गावाची अर्थव्यवस्था मजबूत होईल त्याचप्रमाणे स्थानिक रोजगार वाढतील, गावातील स्थलांतर कमी होईल तसेच गावातच व्यवसायाची संधी मिळेल ही योजना महिलांना सक्षम करण्याबरोबरच ग्रामीण विकासाला चालना देणारे योजना आहे.
हे पण वाचा : लाडकी बहीण योजेनसाठी अशा पद्धतीने करा अर्ज आणि मिळवा ₹1500 महिना, पहा संपूर्ण प्रक्रिया

SHE Marts Yojana 2026 अर्ज प्रक्रिया
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील काही मुख्य बाबी आहेत
- महिलांचा स्वयं-सहायता गट (SHG) असणे आवश्यक आहे
- ग्रामीण व शहरी भागातील महिला उद्योजका महिला
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी सरकारकडून लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू केली जाणार आहे व त्याचप्रमाणे संबंधित योजनेचे सरकारी पोर्टल देखील लवकरच सुरू होणार आहे त्याचप्रमाणे महिलांनी या योजनेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर संबंधित योजनेबाबत व्यवस्थित माहिती तपासणी अर्ज सादर करावा.
FAQ – SHE Marts Yojana 2026
SHE Marts योजना म्हणजे काय ?
SHE-Marts (Self Help Entrepreneur Marts) ही एक केंद्र सरकारची योजना असून महिलांने तयार केलेले उत्पादने थेट बाजारपेठेत विकण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे.
SHE Marts योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
सध्या सरकारकडून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेले नाही लवकरच या योजनेस संबंधित सरकारी पोर्टल सुरू करण्यात येणार आहे.
SHE Marts योजनेचा फायदा काय आहे ?
ग्रामीण भागातील महिलांना थेट बाजारपेठ मिळेल व त्यांच्या उत्पादनाचे त्यांना योग्य दर मिळेल त्यामुळे महिलांचे उत्पन्न वाढेल व त्यांचा फायदा होईल
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो
या योजनेचा लाभ महिला स्वयं-सहायता गट (SHG) ) ग्रामीण व शहरी भागातील उद्योजिका आणि लघु उद्योग चालवणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.

1 thought on “SHE Marts Yojana 2026 : महिलांसाठी सुवर्णसंधी, घरबसल्या उत्पन्न वाढवणारी नवी योजना, केंद्र सरकारची मोठी घोषणा”