Ladki Bahin Yojana Offline eKYC Detail In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये इतकी रक्कम थेट पात्र महिलांच्या खात्यात जमा केली जात आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 पर्यंत चे पैसे जमा केलेले आहेत.
अशातच सरकारने या योजनेचा लाभ गरजू महिलांना मिळावा व ज्या महिला योजनेच्या निकषाचे पान न करता लाभ घेत आहे अशा महिलांना अपात्र करण्यासाठी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे सरकारने अनिवार्य केले आहे परंतु अनेक महिलांनी सरकारने ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये काही कारणामुळे एक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि त्यामुळे त्यांना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाही
आता अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने अशा महिलांसाठी ऑफलाईन ई केवायसी प्रक्रिया सुरू केलेली आहे याबाबतचे निर्देश महाराष्ट्र सरकारकडून जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत तर आज आपण ऑफलाईन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण कशी करायची या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
About Ladki Bahin Yojana Offline eKYC 2026
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले होते परंतु अनेक महिलांनी अद्यापही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्याचप्रमाणे काही महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करतेवेळी पर्याय चुकीचा निवडला आहे अशा सर्व महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही
त्यामुळे सरकारने अशा सर्व महिलांसाठी पुन्हा एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे आता महिलांना ऑफलाइन पद्धतीने ई केवायसी ( Ladki Bahin Yojana Offline eKYC 2026 ) प्रक्रिया पूर्ण करू शकतात आणि त्यानंतर त्यांना योजेने अंतर्गत लाभ मिळेल .
Ladki Bahin Yojana Offline eKYC Document
- स्वतःचे आधार कार्ड
- पतीचे किंवा वडीलाचे आधार कार्ड
- बँक पासबुक
- वडील किंवा पती मयत असेल तर मृत्यू प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
महिलांना ऑफलाइन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागू शकतात .
Ladki Bahin Yojana Online eKYC 2026
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन ई केवायसी प्रक्रिया करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत दिलेली होती त्यामुळे मुद्दा संपले असल्याकारणाने ऑनलाइन ई केवायसी प्रक्रिया बंद केलेली आहे त्यामुळे महिलांना आता फक्त ऑफलाइनच्या माध्यमातून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

Ladki Bahin Yojana Offline eKYC 2026
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अनेक पात्र अशा महिला आहेत ज्यांना योग्य माहिती नसल्यामुळे त्यांनी वेळेमध्ये आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्याचप्रमाणे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना जे काही पर्याय निवडायचे होते ते चुकीचा निवड केला आहे त्यामुळे अशा सर्व महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणे बंद झाले
अशा सर्व महिलांसाठी सरकारने पुन्हा एक संधी दिली आहे त्या महिला ऑफलाइन पद्धतीने आपली ई केवायसी प्रक्रिया पुन्हा एकदा पूर्ण करू शकतात त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ऑफलाइन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांना जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये भेट द्यावी लागेल
- अंगणवाडी केंद्रात भेट दिल्यानंतर अंगणवाडी सेविकेजवळ आवश्यक ती कागदपत्रे सादर करायचे आहे
- आवश्यक सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर अंगणवाडी सेविका मार्फत सर्व कागदपत्राची पडताळणी करून इ केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल
अशाप्रकारे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने आपली इ केवायसी प्रक्रिया ( Ladki Bahin Yojana Offline eKYC 2026 ) पूर्ण करू शकता त्याचप्रमाणे ई केवायसी करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला असेल तो पण अंगणवाडी सेविकेमार्फत दुरुस्त करून दिला जाईल व तुम्हाला पुन्हा या योजनेअंतर्गत लाभ मिळेल.
Majhi Ladki Bahin Yojana – Important Link
| Majhi Ladki Bahin Yojana e-KYC Online | Click Here |
| Ladki Bahin Yojana 2026 – Online Apply | Click Here |
| Ladki Bahin Yojana Offline e-KYC 2026 | Click Here |
FAQ- Ladki Bahin Yojana Offline eKYC 2026
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार का नाही ?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी आपली ऑफलाइन ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जर महिला योजनेच्या निकषात बसत असतील तर त्या महिलांना चिंता करण्याची आवश्यकता नाही थांबलेल्या सर्व हप्त्याचे पैसे त्यांना एकत्रित दिले जातील
Ladki Bahin Yojana ekyc Last Date ?
महाराष्ट्र सरकारकडून ऑफलाइन ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही परंतु महिलांनी परवरी महिन्याच्या शेवटपर्यंत आपली ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.

7 thoughts on “Ladki Bahin Yojana Offline eKYC 2026 : अशा प्रकारे करा ऑफलाईन eKYC, लाडक्या बहिणीला शेवटची संधी”