Ladki Bahin Yojana Latest News In Marathi : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीचा मोठा आधार झालेला आहे या योजनेच्या माध्यमातून महिला लाभ घेऊन आपल्या परिवाराचा सांभाळ करत आहे या योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक महिन्याला 1500 रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा करत आहे.
परंतु महायुती सरकारने महिलांना आश्वासन दिले होते की या योजनेअंतर्गत विधानसभा निवडणुकीत आम्ही पुन्हा सतेत आल्यास या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये महिना देऊ अशातच महायुती सरकारला मोठे यश प्राप्त झाल्याने त्यांचे सरकार स्थापन झाले परंतु अद्याप आतापर्यंत या योजनेअंतर्गत 2100 रुपये देण्यात आलेले नाही.
अशातच महिलांकडून वारंवार प्रश्न उपस्थित केला जात होता की या योजनेअंतर्गत 2100 रुपये कधीपासून महिलांना मिळणार अशातच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती देणार आहोत.
Table of Contents
उपमुख्यामंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
महाराष्ट्र सरकारकडून सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिला पंधराशे रुपये दिले जात आहे आतापर्यंत सरकारने डिसेंबर 2025 पर्यंतचे पैसे पात्र महिलांच्याखात्यात जमा केले आहेत परंतु महायुती सरकारकडून मागील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान महिलांना आश्वासन देण्यात आले होते की आमचे सरकार आल्यास या योजनेअंतर्गत पुन्हा निधीत वाढ करून 2100 रुपये महिना दिला जाईल यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले की सरकारने ज्या आश्वासन दिले आहेत ते सर्व आश्वासन पूर्ण करणार आणि ही योजना बंद होणार नाही.

डिसेंबर व जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार
राज्यातील महिला डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याच्या आतुरतेने वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे पुढील महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे सरकारने महानगरपालिकेच्या मतदानाच्या अगोदर 14 जानेवारी 2026 रोजी डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्या जमा केला
त्याचप्रमाणे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून उर्वरित महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता व त्याचप्रमाणे जानेवारी महिन्याचा हप्ता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदर म्हणजे फरवरी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा होणारअशी माहिती समोर येत आहे परंतु अद्याप सरकारने या संदर्भात कुठलीच घोषणा केली नाही.
Majhi Ladki Bahin Yojana – Important Link
| Majhi Ladki Bahin Yojana e-KYC Online | Click Here |
| Ladki Bahin Yojana e-KYC Offline 2026 | Click Here |
| Majhi Ladki Bahin Yojana e-KYC Edit | Click Here |
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.

1 thought on “Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांबाबत अखेर आनंदजी बातमी, प्रजासत्ताक दिनी उपमुख्यामंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा,”