Ladki Bahin Yojana eKYC Problem News In Marathi : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली अत्यंत महत्वकांक्षा योजना ज्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सध्या या योजनेची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ निरंतर घेण्यासाठी eKYC प्रक्रिया पूर्ण करणे महिलांना अनिवार्य केलेले होते परंतु eKYC प्रक्रिया दरम्यान अर्जातील एका प्रश्नाचा अर्थ समजल्या नसल्यामुळे 25 लाख महिला अपात्र झालेले आहेत.
आता त्या महिलांच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर चे पैसे जमा झालेले नाही या मागचे कारण काय ? आणि कोणता तो प्रश्न ज्या प्रश्नामुळे 24 लाख महिला तात्पुरत्या स्वरूपात अपात्र झाल्या आहेत या ( Ladki Bahin Yojana eKYC Problem ) संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
लाडक्या बहिणीला eKYC करणे अनिवार्य का ?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी अडीच कोटी पेक्षा अधिक महिलांनी ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज सादर केले होते मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार अनेक महिला या योजनेच्या निकषात बसत नव्हत्या त्याही महिला या योजनेचा लाभ घेत आहे अशा तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्या, त्याचप्रमाणे पुरुष पण यामुळे योजनेचा लाभ घेत आहे अश्या तक्रारी विभाग कडे प्राप्त झाल्या होत्या.
त्यामुळे गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सरकारने लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे महिलांना अनिवार्य करण्यात आलेआहे.
एका प्रश्नाने केला मोठा गेम 24 लाख महिला अपात्र
महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ करणाऱ्या महिलांना ऑनलाईन eKYC प्रक्रिया सुरू केली होती आणि महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत eKYC प्रक्रिया पूर्ण करायची होती परंतु अनेक महिलांनी eKYC प्रक्रिया करतेवेळी प्रश्नाचा अर्थ समजल्या नसल्यामुळे चुकीचा पर्याय निवडलेला आहे आणि मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार 24 लाख महिलाना या योजनेअंतर्गत लाभ मिळणे तात्पुरत्या स्वरूपात बंद झालेले आहे.

काय आहे तो नेमका प्रश्न
यासंदर्भात महिला व बालकल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एका प्रश्नाच्या रचनेमुळे लाभार्थी महिलांचा गोंधळ उडाला आहे अर्जात एक मराठीत प्रश्न विचारण्यात आला होता तुमच्या घरातले कोणी सरकारी नोकरीत नाही ना ? अशा प्रकारचे प्रश्न त्या फॉर्ममध्ये दिलेले होते परंतु प्रश्नाचा अर्थ समजल्या नसल्याकारणाने महिलांनी चुकीचा पर्याय निवडला आणि त्यामुळे पंचवीस लाख महिला तात्पुरत्या स्वरूपात अपात्र झाल्या.
महाराष्ट्र सरकारने दिला महिलांसाठी मोठा दिलासा
अनेक महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाही काही महिलांनी eKYC प्रक्रिया पूर्ण करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला आणि त्याचप्रमाणे काही महिलांनी सरकारने ठरवून दिलेले कालावधीमध्ये eKYC केलीच नाही परंतु अशा महिलांसाठी सरकारने दिलासा दिलेला आहे
आता जवळच्या अंगणवाडी केंद्रामार्फत महिलांची eKYC प्रक्रिया केली जाणार आहे आणि अंगणवाडी सेविका अशा महिलांच्या घरी जाऊन फिजिकल व्हेरिफिकेशन पद्धतीने eKYC करणार आहे.
Majhi Ladki Bahin Yojana – Important Link
| Majhi Ladki Bahin Yojana e-KYC Online | Click Here |
| Ladki Bahin Yojana e-KYC Offline 2026 | Click Here |
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.
