Ladki Bahin Yojana eKYC 2026 : महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना महाराष्ट्र सरकारकडून 1500 रुपये आर्थिक मदत दर महिन्याला दिली जात आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती त्या कालावधीमध्ये 2.5 कोटी पेक्षा अधिक महिलांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर केले आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत पात्र महिलांना जानेवारी 2026 पर्यंतचे पैसे दिलेले आहेत.

अशातच सरकारने मागील काही महिन्यामध्ये या योजनेसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना अखंडित लाभ घेण्यासाठी eKYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे जर महिला आपली eKYC प्रक्रिया पूर्ण करणार नाही अशा महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिले जाणार नाही तर आज आपण लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन व ऑफलाईन eKYC प्रक्रिया पूर्ण कशी करायची या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin Yojana eKYC 2026 – Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
विभागमहिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र राज्य
आर्थिक मदत1500 रुपये प्रति महिना
लाडकी बहीण योजना eKYC प्रक्रियाऑनलाइन
Ladki Bahin Yojana Online eKYC Last Date31 डिसेंबर 2025
Ladki Bahin Yojana eKYC Linkhttp://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर 181

Ladki Bahin Yojana eKYC का आवश्यक आहे ?

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाडक्या बहिणींना अखंडित लाभ घेण्यासाठी eKYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे परंतु अनेक महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की eKYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य का करण्यात आली आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचे लाभ फक्त गरजू लाभार्थी महिलांना मिळावा आणि कोणीही डुबलीकेट डॉक्युमेंट व फसवणूक करून लाभ घेऊ नये त्यासाठी सरकार ने eKYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आलेल आहे.

परंतु या योजनेच्या निकषाचे पालन करून ज्या महिला लाभ घेत आहेत त्या महिलांनी आपली eKYC प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घ्यावे अशा महिलांना या योजनेअंतर्गत अखंडित लाभ मिळत राहणार आहे परंतु जर महिला eKYC प्रक्रिया शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करणार नाहीत त्यांना या योजनेअंतर्गत पुढे लाभ मिळणार नाही.

Ladki Bahin Yojana eKYC Process 2026

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची eKYC प्रक्रिया पूर्ण करणे आता सरकारकडून अनिवार्य करण्यात आलेला आहे जर महिला आपली eKYC प्रक्रिया पूर्ण करणार नाही अशा महिलांना योजनेअंतर्गत अपात्र करण्यात येणार आहे तर आज आपण योजनेच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन घरबसल्या eKYC प्रक्रिया पूर्ण कशी करायची याबाबत संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत.

  • सर्वात पहिले तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ) भेट द्यावी लागेल
  • आता तुमच्या समोर वेबसाईटचा होम पेज ओपन होईल त्यामध्ये eKYC या पर्यावर क्लिक करायचा आहे
Ladki BahinYojana ekyc Online
Ladki BahinYojana ekyc Online
  • आता तुम्हाला तुमचा आधार नंबर व कॅपच्या फील करून ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक करायचा आहे
Ladki BAhin Yojana ekyc
Ladki BAhin Yojana ekyc
  • आता तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येणार तो डीपी टाकून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे
Ladki BAhin Yojana ekyc
Ladki BAhin Yojana ekyc
  • आता तुम्हाला तुमच्या पतीचा किंवा वडीलाचा आधार नंबर टाकून कॅपच्या फील करून घेऊन ओटीपी पाठवा या पर्यावर क्लिक करायचा आहे
  • पतीचे किंवा वडिलांच्या आधार ला लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी येणार ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे
  • आता तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म ओपन होणार त्यामध्ये तुम्हाला काही पर्याय निवडायचे आहे
Ladki BAhin Yojana ekyc
Ladki Bahin Yojana ekyc Online 2026
  • योग्य पर्याय निवडून सबमिट या पर्यावर क्लिक करून घ्यायचा आहे
ladki Bahin Yojana Online Ekyc
ladki Bahin Yojana Online Ekyc

अशाप्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आपली eKYC प्रक्रिया पूर्ण करू शकता.

Ladki Bahin Yojana eKYC Offline 2026

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची ऑनलाईन eKYC करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 होती त्या कालावधीमध्ये अनेक महिलांनी आपली eKYC प्रक्रिया पूर्ण करून घेतली नाही परंतु अनेक महिलांनी eKYC करते वेळी चुकीचा पर्याय निवडला त्याचप्रमाणे काही महिलांनी आपली ई -केवायसी पूर्ण केलीच नाही आणि त्यामुळे त्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही

ही बाब सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने अशा महिलांसाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली आहे आता त्या महिला जवळच्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविके मार्फत ऑफलाईन पद्धतीने आपली eKYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात ऑफलाइन पद्धतीने कशा प्रकारे eKYC प्रक्रिया पूर्ण करायची याची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • महिलांनी अर्ज करताना जी कागदपत्रे सादर केले होते ते सर्व कागदपत्रे महिलांना पुन्हा एकदा तयार करावे
  • सर्व कागदपत्रे तयार केल्यानंतर महिलांना आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेची संपर्क करावा
  • अंगणवाडी सेविकेजवळ आवश्यक सर्व कागदपत्रे जमा करावे व योग्य माहिती सांगावी
  • त्यानंतर अंगणवाडी सेविकेंमार्फत लाभार्थी महिलांची कागदपत्रे तपासले जातील
  • जर महिला या योजनेच्या निकषात बसत असेल त्या महिलांची eKYC व दुरुती प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
Ladki Bahin Yojana eKYC Offline 2026
Ladki Bahin Yojana eKYC Offline 2026

तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ मिळाला नाही त्या लवकरात लवकर आपली eKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्याव्या.

Ladki Bahin Yojana e-KYC Offline 2026 –Click Here
Ladki Bahin Offline eKYC Document –Click Here
Ladki Bahin Yojana e-KYC Edit 2026Click Here

FAQ- Ladki Bahin Yojana eKYC 2026

लाडकी बहीण योजनेसाठी E-KYC करण्याची शेवटची तारीख

31 डिसेंबर 2025 – परंतु सरकारने आता ऑफलाईन ई केवायसी करण्याची महिलांना संधी दिलेली आहे

लाडकी बहीण योजनेची E-KYC स्वतः करू शकतो का ?

लाडकी बिल योजनेची E-KYC स्वतः आपल्या मोबाईल फोन ने घरबसल्या करू शकता

लडकी बहीण योजनेची E-KYC करणे अनिवार्य आहे का ?

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजनेचा अखंडित लाभ घेण्यासाठी E-KYC स्वतः अनिवार्य करण्यात आले आहे.

फरवरी 2026 महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार

20 मार्च 2026 ते 25 मार्च 2026 या कालावधीमध्ये लाभ वितरण प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे

ई -केवायसी मधील दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख ?

31 मार्च 2026