Ladki Bahin Yojana : पुढील 48 तासांमध्ये जमा होणार उर्वरित महिलांच्या खात्यात पैसे, पण या महिला राहणार वंचित

Ladki Bahin Yojana News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यांमध्ये अशा लाखो महिला आहेत ज्यांना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाही अशा महिलांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेऊन जीआर काढण्यात आलेला आहे त्यामुळे आता अशा महिलांच्या खात्यात पुढील 48 तासांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि कोणत्या महिलांना नाही या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

लाडक्या बहिणींना मोठा दिलासा

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले होते महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई केवायसी करण्याची अंतिम मुदत दिली होती त्या कालावधीमध्ये कोटी वधी महिलांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली परंतु अनेक महिलांना ई केवायसी पूर्ण करून सुद्धा डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाही

मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार तांत्रिक कारणामुळे व अपूर्ण निधीमुळे अनेक महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत. तर अशा सर्व महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे या संदर्भात सरकारने 20 जानेवारी 2026 रोजी एक नवीन जीआर काढलेला आहे आणि आता लवकरच अशा सर्व महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होणार आहे.

पण या महिला राहणार वंचित

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी पण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठेवलेले होते त्यांनी निकषाच्या आधारावर सरकार लाडक्या बहिणीला पैसे देत आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्या सहकारी कर्मचारी आहे व त्याचप्रमाणे इतर योजनेअंतर्गत त्यांना आर्थिक लाभ मिळत आहे अशा पण या योजेनचा लाभ व त्याचप्रमाणे ई केवायसी करते वेळेस चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलां अशा सर्व महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळणार नाही.

हे पण वाचा : eKYC मध्ये चूक केलेल्या महिलांना पुन्हा एक संधी, सरकारचा नवा आदेश जारी, पहा संपूर्ण माहिती

48 तासांमध्ये जमा होणार महिलांच्या खात्यात पैसे

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता उर्वरित महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी 20 जानेवारी 2026 रोजी नवीन जीआर काढून निधीची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले नव्हते अशा पात्र महिलांच्या खात्यात पुढील 48 तासांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

1 thought on “Ladki Bahin Yojana : पुढील 48 तासांमध्ये जमा होणार उर्वरित महिलांच्या खात्यात पैसे, पण या महिला राहणार वंचित”

Leave a Comment