Ladki Bahin New Update Feb 2026 : मोठी बातमी! लाडक्या बहिणींनो हे काम तात्काळ करा – खात्यात जमा होतील संपूर्ण पैसे, सरकारची स्पष्ट सूचना

Ladki Bahin New Update Feb 2026 In Marathi : महाराष्ट्र राज्यातील सर्वात चर्चेत असलेले मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना 1500 रुपये महिना दिले जात आहे आतापर्यंत सरकारने या योजने अंतर्गत डिसेंबर 2025 पर्यंतच्या हप्त्याचे पैसे महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केलेले आहेत

परंतु राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्या महिलांना नोव्हेंबर पासून पैसे मिळणे बंद झाले या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अनेक महिलांनी ई – केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला होता त्यामुळे त्यांना नोव्हेंबर पासून चे पैसे मिळणे बंद झाले त्याचप्रमाणे अनेक महिला या योजनेच्या निकषात बसत नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळेल बंद झाले अशा सर्व महिलांना पुन्हा एकदा या योजनेअंतर्गत लाभ कसा मिळणार आणि सरकारचे काय नवीन निर्देश दिलेआहेत याबाबत ( Ladki Bahin New Update Feb 2026 ) सविस्तर माहिती पुढे आम्ही तुम्हाला देणार आहोत.

About Ladki Bahin New Update Feb 2026

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ गरजू महिलांनाच मिळावा यासाठी सरकारने या योजनेची ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे महिलांना अनिवार्य केले होते सरकारने त्यासाठी 31 डिसेंबर 2025 हे शेवटची तारीख दिली होती त्यामध्ये काय महिलांनी ई – केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला आणि त्यामुळे त्यांना पैसे मिळणे बंद झाले अशा महिलांना सरकारने पुन्हा एकदा ई – केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची संधी पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे महिला पुन्हा एकदा योग्य पर्याय निवडून ई – केवायसी पूर्ण करू शकतात

परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांनी ई केवायसी प्रक्रिया योग्य पद्धतीने केली आहे परंतु त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणे बंद झाले. अशा महिलांसाठी सरकारने काय निर्देश दिले आहेत त्या निर्देशाचे पालन करून महिला ती प्रक्रिया पूर्ण केल्यास महिलेंना या योजनेअंतर्गत लाभ पुन्हा मिळणार.

ई – केवायसी योग्य करून सुद्धा लाभ का मिळत नाही ?

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठेवलेले होते त्यामध्ये महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, महिलांचे वय 21 ते 65 वर्ष वयोगटातील असावे, महिलांच्या कुटुंबाच्या सदस्याच्या नावे चार चाकी वाहन नसावी, महिला लाभार्थी इतर शासकीय योजनेची लाभार्थी नसावी, महिला कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी नसावा व इतर

परंतु अनेक महिलांनी या योजनेच्या निकषांचे पालन न करता अर्ज सादर करून या योजनेअंतर्गत लाभ घेत होत्या यासंदर्भात महिला व बालविकास विभाग कडे तक्रारी प्राप्त होत होत्या या बाबीवर सरकारने लक्ष देऊन सुरुवातीला अनेक महिलांच्या अर्जाची पडताळणी केली त्यामध्ये अनेक महिला वरील निकषाचे पाल न करता लाभ घेत असलेल्या आढळल्या त्यामुळे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणे बंद झाले.

या चार कारणामुळे लाखो महिला झाल्या अपात्र

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी केलेली आहे त्यामध्ये चार कारणे समोर आले आहे त्यामुळे महिलांना या योजना अंतर्गत लाभ मिळेल बंद झालेले आहे त्याची माहिती खालील प्रमाणे आहे

  • महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक 2.5 लाखापेक्षा जास्त असणे
  • महिलाच्या कुटुंबातील सदस्याचे नावे चार चाकी वाहन असणे
  • महिलाही 21 ते 65 वयोगटातील नसणे
  • महिला इतर शासनाच्या आर्थिक योजनेची लाभार्थ्याने

अशा काही प्रमुख चार कारणामुळे अनेक महिलांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणे बंद झालेले आहे.

Ladki Bahin New Update Feb 2026
Ladki Bahin New Update Feb 2026

अशा प्रकारे करा तक्रार चालू होतील पैसे

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ई – केवायसी प्रक्रिया योग्य प्रमाणे पूर्ण करून सुद्धा ज्या महिलांचे पैसे बंद झाले आहे त्या महिलांना सरकारने योजनेच्या निकषात बसत नसल्यामुळे अपात्र केले आहे आणि त्यामुळे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल बंद झाले परंतु सरकारने अशा महिलांसाठी पण पुन्हा एकदा संधी दिली आहे

महिला जर या योजनेच्या निकषात खरंच बसत असेल परंतु तांत्रिक कारणामुळे व पडताळणी दरम्यान चुकीने महिला अपात्र झाली असेल अशा महिला सरकारकडे तक्रार करून योजनेचा पुन्हा लाभ घेऊ शकतात त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.

  • सर्वात पहिले महिलांनी जवळच्या महिला व बाल विकास विभागाची संपर्क करावा
  • महिला व बाल विकास विभागामार्फत महिलांना पैसे का दिले जात नाहीत त्यांचे स्पष्ट कारण जाणून घ्या
  • पैसे न मिळण्याचे कारण माहित झाल्यानंतर महिलांना ऑनलाईन तक्रार करायची आहे
  • त्यासाठी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ) व्हिजिट करावे लागेल
  • त्यामध्ये grievance या पर्यायावर क्लिक करायचा आहे
  • आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करून तक्रार सबमिट करायचे आहे

तक्रार सबमिट झाल्यानंतर तुमच्या कागदपत्राची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार जर तुम्ही या योजनेच्या निकषात बसत असाल तर तुम्हाला पुन्हा एकदा या योजनेअंतर्गत लाभ नक्की मिळणार.

अशा महिलांसाठी आवश्यक कागदपत्रे

महिलांना तक्रार करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे आहे त्याची माहिती खालील प्रमाणे आहे

कुटूंबाचे वार्षिक इनकम 2.5 लाख यापेक्षा जास्त आहे या कारणाने पैसे बंद केले असेल तर कागदपत्रे
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • पती-पत्नी आधार कार्ड
  • पती-पत्नीचे पॅन कार्ड
  • राशन कार्ड
कुटुंबाच्या सदस्याच्या नावे चार चाकी वाहन या कारणाने पैसे बंद केले असेल तर कागदपत्रे
  • राशन कार्ड वर असलेले सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड
  • राशन कार्ड
वयाच्या कारणाने पैसे बंद केले असेल तर कागदपत्रे
  • शाळा सोडण्याचा दाखला
  • जन्म प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
संजय गांधी निराधार योजना लाभ घेत असल्या कारणाने पैसे बंद केले असेल तर कागदपत्रे
  • लाभार्थ्यांचे आधार कार्ड
  • तहसीलदार यांचे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत नसल्या बाबतचे प्रमाणपत्र

अशा प्रकारे हे काही आवश्यक कागतपत्रे आहेत.

Ladki Bahin Yojana e-KYC Online – प्रक्रियाClick Here
Ladki Bahin Yojana Offline e-KYC 2026Click Here
Ladki Bahin eKYC Approval List 2026Click Here

Leave a Comment