Ladki Bahin Installment 2026 : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठा दिलासा निर्णय घेतलेला आहे ज्या महिलांनी e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडला होता अशा महिलांना पुन्हा एकदा e-KYC मध्ये योग्य पर्याय निवडण्यासाठी सरकारने संधी दिलेली आहे आता महिला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून e-KYC मध्ये दुरुस्ती करत आहेत तर अशा महिलांना दुरुस्ती केल्यानंतर पैसे कधी मिळणार ? तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin Installment 2026 – Overview
| योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2026 |
| योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
| राज्य | महाराष्ट्र |
| विभाग | महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन |
| लाभार्थी | गरीब कुटुंबातील महिला |
| आर्थिक मदत | 1500 रुपये महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ ऑफलाइन |
| Ladki Bahin Yojana eKYC Link 2026 | Click Here |
| Ladki Bahin Yojana Official Website | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
| हेल्पलाइन नंबर | 181 |
About Ladki Bahin Installment 2026
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता 14 जानेवारी 2026 रोजी महिलांच्या खात्यात जमा केला होता आता महिला या योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे सुरुवातीला जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान प्रक्रियेच्या अगोदर महिलांच्या खात्यात जमा केला जाणार अशी माहिती समोर येत होती
परंतु अद्याप महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही त्याचप्रमाणे अनेक महिलांनी सुरुवातीला e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडला होता अशा महिलांच्या खात्यात तर नोव्हेंबर पासून चे पैसे जमा झाले नाही आणि आता लवकरच अशा सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.
लाडकी बहीण योजनेचे उद्देश
महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना आपल्या परिवाराचा योग्य प्रकारे सांभाळ करता यावा या उद्देशाने सरकारने 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती या योजनेअंतर्गत दोन कोटी पेक्षा अधिक महिलांना लाभ दिला जात आहे.
e-KYC मध्ये दुरुस्ती केल्यावर पैसे कधी मिळणार?
सुरुवातीला लाडकी बहीण योजनेची e-KYC करताना अनेक महिलांनी चुकीचा पर्याय निवडला आणि त्यांना नोव्हेंबर पासून चे हप्ते मिळणे बंद झाले. या बाबीवर सरकारने लक्ष देऊन पुन्हा एकदा अशा सर्व महिलांसाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि अनेक महिलांनी आपली e-KYC मध्ये दुरुस्ती पूर्ण केलेली आहे तर आता हप्त्याचे पैसे कधी मिळणार ?
असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महिलांच्या खात्यात फरवरी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उर्वरित सर्व हप्त्याचे पैसे जमा केले जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेत e-KYC Error का येतो? पैसे मिळणार की नाही? जाणून घ्या
अशाप्रकारे करा e-KYC मध्ये दुरुस्ती
महाराष्ट्र सरकारने राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा दिलेला आहे ज्या महिलांनी e-KYC करतानी चूक केली होती अशा महिलांना पुन्हा एकदा मध्ये e-KYC मध्ये दुरुस्ती करण्यासाठी सरकारने संधी दिली आहे त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- त्यासाठी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://ladakibahin.maharashtra.gov.in ) भेट द्यावी लागेल

- भेट दिल्यानंतर e-KYC पर्यावर क्लिक करायचा आहे
- आता महिलांना स्वतःचा आधार नंबर टाकायचा आहे आणि OTP पाठवा या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
- महिलांच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येणार ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्यावा
- आता महिलांसमोर पुन्हा एकदा पर्याय निवडण्याचा पेज दिसेल
- त्यामध्ये महिलांना योग्य पर्याय निवडायचा आहे

- पर्याय निवडल्यानंतर सबमिट पर्यावर क्लिक करायचा आहे

अशाप्रकारे लाडकी बहीण योजनेची ई -केवायसी मध्ये दुरुस्ती करू शकता.
e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख
लाडकी बहीण योजनेची ई -केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची सरकारने 31 मार्च 2026 ही शेवटची तारीख दिली आहे त्यासाठी महिलांनी 31 मार्च 2026 च्या अगोदर आपलीई -केवायसी मध्ये दुरुस्ती करून घ्यावी ज्या महिला ई -केवायसी मध्ये दुरुस्ती करणार नाहीत त्या महिलांना या योजनेतून कायमस्वरूपी अपात्र केले जाणार.
Ladki Bahin Installment 2026 – Important Link
| Majhi Ladki Bahin Yojana e-KYC Online | Click Here |
| Ladki Bahin Yojana 2026 – Online Apply | Click Here |
| Ladki Bahin Yojana Offline e-KYC 2026 | Click Here |
FAQ- Ladki Bahin Installment 2026
ई -केवायसी मध्ये दुरुस्ती केलेल्या महिलांना कधी पैसे मिळतील
ई -केवायसी मध्ये दुरुस्ती केलेल्या महिलांना फरवरी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उर्वरित सर्व हप्त्याचे पैसे जमा केले जातील
e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख काय आहे
31 मार्च 2026 ही शेवटची तारीख दिली आहे
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.

2 thoughts on “Ladki Bahin Installment 2026 : e-KYC मध्ये दुरुस्ती केल्यावर पैसे कधी मिळणार? जाणून घ्या सर्व माहिती!”