Ladki Bahin Hafta 2026 : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, तीन महिन्यांचा थकीत हप्ता 4500 रुपये मिळणार, पण या महिलांना नाही मिळणार पैसे

Ladki Bahin Hafta 2026 News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांचे ई -केवायसीमुळे नोव्हेंबर पासूनचे हप्ते थांबलेले आहे अशातच लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे महिला व बालविकास विभागून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली असून आता पात्र महिलांच्या खात्यात थेट 4500 रुपये जमा केले जाणार आहेत तर आज आपण या ( Ladki Bahin Hafta 2026 ) संदर्भात संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत.

ई -केवायसीमुळे अनेक महिलांचे थांबले हप्ते

राज्यातील लाखो महिलांची ई -केवायसी पूर्ण न झाल्यामुळे त्याचप्रमाणे ई -केवायसी चूक केल्या कारणाने नोव्हेंबर पासूनचे हक्क थांबलेली आहे त्याचप्रमाणे काही महिलांनी ई -केवायसी योग्य प्रकारे करून सुद्धा त्यांना नोव्हेंबर पासून हप्ते मिळणे बंद झालेले आहे त्यामुळे अनेक ठिकाणी महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या घटना समोर येत आहे.

योजनेची ऑफलाइन ई -केवायसी सुरू

महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविकांना अशा महिलांच्या घरोघरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत व ज्या महिला या योजनेच्या निकषात बसतील त्यांना पात्र करण्यात येणार आहे व ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत त्यांना योजनेअंतर्गत अपात्र घोषित करण्यात येणार आहे.

तीन महिन्यांचा थकीत हप्ता 4500 रुपये मिळणार

महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांना एकत्रित देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार आता महिलांच्या खात्यात थेट साडेचार हजार रुपये जमा होणार आहे ज्यांना आधी डिसेंबर नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले अशा महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता मिळणार आहे आणि ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही अशा महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर तसे जानेवारी महिन्याचा ( Ladki Bahin Hafta 2026 ) मिळून 4500 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे .

Ladki Bahin Hafta 2026
Ladki Bahin Hafta 2026

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?

महायुती सरकारकडून विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींना आश्वासन देण्यात आले होते या योजनेअंतर्गत 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये महिना आम्ही देऊ त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सावंत व अनेक महायुतीचे नेते मंडळींनी याबाबत सकारात्मक संकेत दिलेले दिसून येत आहे हा निर्णय झाल्यास राज्यातील कोटी वधी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Ladki Bahin Offline eKYC DocumentClick Here
Ladki Bahin eKYC Offline 2026 Click Here


1 thought on “Ladki Bahin Hafta 2026 : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, तीन महिन्यांचा थकीत हप्ता 4500 रुपये मिळणार, पण या महिलांना नाही मिळणार पैसे”

Leave a Comment