Ladki Bahin eKYC Update Today : लाडक्या बहिणीचे टेन्शन वाढणारी बातमी, जानेवारीच्या हप्त्यापासून लाखो महिला राहणार वंचित

Ladki Bahin eKYC Update Today In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी टेन्शन देणारी बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना eKYC मध्ये दुरुस्ती करण्याची पुन्हा एकदा संधी दिली आहे परंतु ज्या महिलांनी अद्याप eKYC केली नाही आता त्या महिला योजनेच्या लाभ पासून वंचित राहणार अशी माहिती समोर येत आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

जानेवारीच्या हप्त्यापासून लाखो महिला राहणार वंचित

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचे लाभ फक्त गरजू महिलांना मिळावा आणि ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाही त्या महिलांना या योजनेतून अपात्र करावे ह्या उद्देशाने सरकारने या योजनेची eKYC प्रक्रिया सुरू केली होती त्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2025 हे शेवटची तारीख ठेवलेली होती

त्यामध्ये लाखो महिलांनी आपली eKYC प्रक्रिया पूर्ण केली परंतु अनेक महिलांनी आपली eKYC प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यामुळे त्यां महिलांना या योजना अंतर्गत लाभ मिळणे बंद झाले आहे आता त्या महिला या योजनेच्या हप्त्यापासून वंचित आहेत.

अशा महिलांसाठी नवीन eKYC प्रक्रिया कधी सुरू होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यांमध्ये अशा अनेक महिला आहेत त्यांनी अद्याप eKYC केलीच नाही अशा महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे सरकारने eKYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा योजनेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध केलेली आहे .

परंतु नवीन महिलांना eKYC करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करण्यात आली नाही त्यामुळे महिलांनी आपल्या अंगणवाडी सेविकेची संपर्क करावा आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करून घ्यावेत जेणेकरून ऑफलाइन पद्धतीने eKYC प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

या महिलाना मिळणार एकत्रित 4500 रुपये

राज्यातील अनेक महिलांनी सुरुवातीला eKYC करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांना नोव्हेंबर पासून चे पैसे मिळणे बंद झालेले होते अशा महिलांना सरकारने पुन्हा एकदा संधी दिली आहे आणि त्या महिला आता लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून Ladki Bahin eKYC मधील दुरुस्ती करू शकतात आणि त्या महिलांना एकत्रित नोव्हेंबर ते जानेवारी महिन्याचे 4500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

या महिलाना मिळणार 1500 रुपये

महाराष्ट्र सरकारकडून 14 जानेवारी 2026 रोजी डिसेंबर महिन्याचे पैसे लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते आता महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशा सर्व महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याची पंधराशे रुपये सरकारकडून पुढील काही दिवसांमध्ये जमा केले जाणार आहे.

ई – केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची महिलांना शेवट संधी

महाराष्ट्र सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना ई केवायसी दुरुस्ती करण्याची शेवटची संधी दिली आहे त्यासाठी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या ( https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ) माध्यमातून ई केवायसी ( Ladki Bahin eKYC ) मध्ये दुरुस्ती करायचे आहे त्यासाठी सरकारने 31 मार्च 2026 ही शेवटची तारीख दिली आहे

Ladki Bahin eKYC Update Today
Ladki Bahin eKYC Update Today

ज्या महिला सरकाने दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई केवायसी मध्ये दुरुस्ती करणार नाहीत त्या महिला या योजनेच्या लाभापासून कायम वंचित राहणार आहेत त्यासाठी महिलांनी लवकरात लवकर आपली ई -केवासी प्रक्रिया अचूक पद्धतीने पूर्ण करून घ्यावी.

Ladki Bahin Yojana e-KYC Online – प्रक्रियाClick Here
Ladki Bahin Yojana Offline e-KYC 2026Click Here

Leave a Comment