Ladki Bahin eKYC Update News In Marathi : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा e-KYC प्रक्रिया सुरू केली आहे त्यामध्ये ज्या महिलांनी सुरुवातीला e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडला होता सध्या अशा महिलांना e-KYC मध्ये पुन्हा एकदा पर्याय निवडण्याची शेवटची संधी उपलब्ध करून दिलेली आहे.
मात्र अनेक महिलांना e-KYC करताना हा आधार क्रमांक e-KYC दुरुस्तीचे यादीत नाही असा संदेश येत आहे त्यामुळे महिलांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे याचा नेमका अर्थ काय ? या योजनेअंतर्गत पैसे मिळणार का नाही तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
लाडकी बहीण योजनेत e-KYC Error का येतो?
ज्या महिलांनी सुरुवातीला e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडला आणि त्या महिलांना नोव्हेंबर पासून चे पैसे मिळणे बंद झाले अशा महिलांना लाभ मिळावा यासाठी सरकारने e-KYC मध्ये पुन्हा एकदा दुरुस्ती करण्याची सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेली आहे परंतु काही महिलांनी आपले आधार नंबर टाकल्यानंतर हा आधार क्रमांक e-KYC दुरुस्तीचे यादीत नाही
असा मेसेज त्यांना येत आहे तर या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार असा संदेश जर तुम्हाला येत असेल तर तुमची e-KYC आधीच पूर्ण झालेली आहे आणि त्यात कोणतीही दुरुस्ती नाही.

करिता अशा स्थितीमध्ये महिलांना चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही ज्यांनी योग्य पद्धतीने आपली ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना पुन्हा एकदा e-KYCआवश्यकता नाही आणि जर तुम्हाला पैसे मिळणे बंद झाले असेल तर या संदर्भात तुम्ही जवळच्या अंगणवाडी सेवेकी संपर्क साधून तुमची नेमके कारण काय आहे हे सविस्तर माहिती प्राप्त करू शकता.
अद्याप ई -केवायसी केलीच नाही त्यांचं काय ?
परंतु ज्या महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया पूर्णच केली नाही अशा महिलांचं काय ? असा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अशा महिलांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेची संपर्क करून आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी त्यासाठी महिलांना आवश्यक सर्व कागदपत्रे व माहिती अंगणवाडी सेविकेजवळ द्यावी लागेल आणि त्यानंतर अशा महिलांना पण या योजनेअंतर्गत लाभ मिळणार.
Ladki Bahin Yojana e KYC Online 2026 – Important Link
| Majhi Ladki Bahin Yojana e-KYC Online | Click Here |
| Ladki Bahin Yojana 2026 – Online Apply | Click Here |
| Ladki Bahin Yojana Offline e-KYC 2026 | Click Here |
FAQ – Ladki Bahin eKYC Update 2026
eKYC मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख आहे ?
31 मार्च 2026
ई -केवायसी केलीच नाही त्यांचं काय ?
अशा महिलांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेचे संपर्क करून आवश्यक सर्व कागदपत्रे माहिती सादर करून ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.

1 thought on “Ladki Bahin eKYC Update 2026 : लाडकी बहीण योजनेत e-KYC Error का येतो? पैसे मिळणार की नाही? जाणून घ्या”