Ladki Bahin eKYC Offline Process In Marathi : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना अखंडित लाभ मिळण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे अनेक महिलांनी eKYC प्रक्रिया पूर्ण करतेवेळी चूक केली त्याचप्रमाणे काही महिलांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्णच केली नाही आणि त्यांना या योजनेअंतर्गत मिळणार लाभ मिळणे बंद झाले अशा महिलांसाठी सरकारने पुन्हा एकदा ऑफलाईन ई केवायसी करण्याची संधी दिली आहे.
परंतु अनेक महिला जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये गेल्या असतात तेथील अंगणवाडी सेविकेला या संदर्भात माहिती नसल्याचे समोर येत होते या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत तालुका पातळीवर फिजिकल वेरिफिकेशन पद्धतीने ही केवायसी पूर्ण करण्याची आदेश देण्यात आलेले आहेत तर आज आपण ऑफलाईन पद्धतीने eKYC ची प्रक्रिया पूर्ण कसे केली जाणार आहे याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत
Table of Contents
About Ladki Bahin eKYC Offline 2026
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ज्या महिलांनी अद्याप eKYC प्रक्रिया पूर्ण केली नाही त्याचप्रमाणे ज्या महिलांनी eKYC प्रक्रिया पूर्ण करते वेळेस पर्याय चुकीचा निवडला आहे अशा महिलांना पुन्हा एकदा eKYC प्रक्रिया पूर्ण करण्याची सरकारने संधी दिली आहे जेणेकरून या योजनेअंतर्गत कोणती पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये
Ladki Bahin eKYC Offline Document
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ऑफलाइन पद्धतीने ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याचप्रमाणे eKYC मध्ये दुरुस्ती करण्यासाठी महिलांसाठी खालील आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागतील.
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र , शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी एक
- महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड , मतदार ओळखपत्र , जन्म प्रमाणपत्र , शाळा सोडल्याचा दाखला , अधिवास यापैकी एक.
- महिलांच्या कुटुंबाची एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळीकेशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
- बँक पासबुक
- हमीपत्र
Ladki Bahin eKYC Offline Process 2026
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ऑफलाइन पद्धतीने eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील स्टेपला फॉलो करावे लागेल.
- सर्वात पहिले महिलांनी वरील आवश्यक सर्व कागदपत्रे तयार करावे लागतील
- त्यानंतर तुम्हाला जवळच्या अंगणवाडी केंद्रात भेट द्यावी लागेल
- अंगणवाडी सेविकेला तुमचा प्रॉब्लेम व्यवस्थितपणे समजून सांगायचं आहे
- त्यानंतर अंगणवाडी सेविकेमार्फत तुमचे कागदपत्रे तपासले जातील
- कागदपत्रे तपासल्यानंतर तुमची ऑफलाइन पद्धतीने ई केवायसी प्रक्रिया केली जाईल

महाराष्ट्र सरकारच्या सूचनेनुसार अंगणवाडी सेविका ज्या महिलांचे पैसे बंद झालेले आहे अशा महिलांच्या घरी जाऊन फिजिकल वेरिफिकेशन च्या माध्यमातून ऑफलाइन पद्धतीने eKYC प्रक्रिया पूर्ण करणार आहे त्यासाठी महिलांनी चिंता करायची आवश्यकता नाही जर तुम्ही योजनेच्या निकषात बसत असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ नक्की मिळणार
Offline eKYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कधीपर्यंत पैसे मिळणार
लाडकी बहीण योजनेची अंगणवाडी सेविकेच्या मदतीने Offline eKYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महिलांना कधीपर्यंत या योजनेअंतर्गत लाभ मिळणार या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिन्यांमध्ये Offline eKYC प्रक्रिया पूर्ण होणार त्या पुढील महिन्यापासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल त्यामध्ये महिलांना उर्वरित सर्व महिन्याचे पैसे मिळणार
.
Majhi Ladki Bahin Yojana – Important Link
| Ladki Bahin Offline eKYC Document | Click Here |
| Ladki Bahin eKYC Problem List 2026 | Click Here |
FAQ – Ladki Bahin eKYC Offline 2026
Online eKYC करते वेळेस चूक झाल्यास दुरुस्ती कसे करावे ?
Online eKYC प्रक्रिया करतेवेळी चूक झाली असेल तर त्यासाठी पण जवळच्या अंगणवाडी केंद्रात भेट देऊन पुन्हा कागदपत्रे सादर करून झालेली चूक दुरुस्त करून घ्यावी.
Ladki Bahin Yojana eKYC Offline Last Date
महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ऑफलाइन eKYC करण्याची अंतिम मुदत अद्याप जाहीर करण्यात आली नाही.
लडकी बहीण योजनेची ऑफलाई eKYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लाभ कधी मिळणार
ऑफलाइन eKYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील महिन्यापासून त्या महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात होईल
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.

8 thoughts on “Ladki Bahin eKYC Offline 2026 : मोठी बातमी ! लाडकी बहीण Offline eKYC सुरू – महिलांना मिळणार रखडलेले योजनेचे पैसे”