Ladki Bahin eKYC Important Notice News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी दिलासदायक बातमी समोर आलेली आहे राज्यांमधील लाखो महिलांनी सुरुवातीला eKYC करतानी चुकीचा पर्याय निवडला आणि त्यांना नोव्हेंबर पासूनचा लाभ मिळणे बंद झाले अशा महिलांसाठी सरकारने पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिलेली आहे
आता महिला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून eKYC मध्ये दुरुस्ती करू शकतात परंतु महिलांनी पुन्हा चूक केल्यास त्या महिलांना कायमस्वरूपी या योजनेतून अपात्र केले जाणार तर आज आपण या संदर्भात प्रक्रिया पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
लाडकी बहीण योजची थोडक्यात माहिती
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना आहेत या योजनेमुळे राज्यातील कोटीवढी महिलांना मोठा आधार झालेला आहे या योजने अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना थेट 1500 रुपये महिना देत आहे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सरकारने डिसेंबर 2025 पर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आणि लवकरच आता जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
Ladki Bahin ऑनलाईन eKYC प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अनेक महिलांनी सुरुवातीला eKYC करताना चुकीचा पर्याय निवडला होता त्यामुळे त्यांना नोव्हेंबर पासून पैसे मिळणे बंद झाले होते आता अशा महिलांना सरकारने पुन्हा एकदा संधी दिली आहे सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर पुन्हा एकदा ई – केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
लाडक्या बहिणींनो हे चूक करू नका.
महाराष्ट्र सरकारने चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलांसाठी पुन्हा एकदा एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि महिलांसाठी ही शेवटची संधी आहे जर महिलांनी आता eKYC करताना चुकीचा पर्याय निवडला तर त्या महिला कायमस्वरूपी या योजनेतून अपात्र केली जाणार आहे त्यासाठी महिलांना योग्य पर्याय निवडणे अत्यंत आवश्यक आहे.
अशा प्रकारे करा eKYC मध्ये दुरुस्ती
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर eKYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ज्या महिलांनी सुरुवातीला चुकीचा पर्याय निवडला होता त्या महिलांना आता योग्य पर्याय निवडायचा आहे तर आता कशाप्रकारे आपण eKYC मध्ये दुरुस्ती करू शकतो खाली स्टेप बाय स्टेप प्रक्रिया दिलेली आहे.
- सर्वात पहिले महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ) जायचं आहे
- आता वेबसाईटचा होम पेज तुमच्यासमोर ओपन होईल

- त्यामध्ये होम पेजवर ई केवायसी करण्याचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचा आहे
- आता लाभार्थी महिलांचे आधार नंबर टाकून कॅपच्या फील करायचा आहे त्यानंतर ओटीपी पाठवा या पर्यावर क्लिक करायचा आहे
- लाभार्थी महिलेच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी येणार ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्यावा
- आता तुमच्यासमोर पुन्हा एकदा पर्याय निवडण्याचा पेज ओपन होईल

- त्यामध्ये महिलांना व्यवस्थित वाचून अचूक पद्धतीने पर्याय निवडायचे आहे
- योग्य पर्याय निवडल्यानंतर सबमिट करा ह्या पर्यायावर क्लिक करायचा आहे
अशाप्रकारे घरबसल्या मोबाईल फोन ने ई -केवायसी मध्ये झालेली चूक दुरुस्त करू शकता .
Ladki Bahin eKYC – Important Link
| Majhi Ladki Bahin Yojana e-KYC Online | Click Here |
| Ladki Bahin Yojana eKYC List 2026 | Click Here |
| Ladki Bahin Yojana Offline e-KYC 2026 | Click Here |
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.
