Ladki Bahin Yojana : आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजनेत महिलांना लवकरच मिळणार 2100 रुपये, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

DCM Eknath Shinde on Ladki Bahin Yojana News In Marathi ; महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीसाठी लोकप्रिय असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या पात्र महिलांना सरकार 1500 रुपये महिना देत आहे अशातच या योजनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये महिना लवकरच दिला जाईल अशी मोठी घोषणा केलेली आहे आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

लाडकी बहीण योजनेची थोडक्यात माहिती

महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब परिवारातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही 28 जून 2024 रोजी सुरू करण्याची घोषणा केली या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिला ज्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे

अशा महिलांना सरकार 1500 रुपये महिना देत आहेत आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 पर्यंत चे पैसे महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केलेले आहेत महिला या योजनेचा लाभ घेऊन आपल्या परिवाराचा योग्य प्रकारे सांभाळ करू शकतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने ही योजना सुरु केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना चालवत आहे अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना आहे अशातच या योजने संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी घोषणा केली आहे त्यांनी सांगितले की या योजनेअंतर्गत लवकरच महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये महिना देण्यात येईल.

Eknath Shinde on Ladki Bahin Yojana
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana

सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक चालू आहे अशातच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचार सभेला संबोधित करतेवेळी महाराष्ट्र सरकार लवकरच महिलांना या योजनेअंतर्गत 2100 रुपये देणार दिलेला शब्द आम्ही नक्की पूर्ण करणार असे आश्वासन त्यांनी दिले त्याचप्रमाणे स्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली देऊन दुःख व्यक्त केले.

या महिलांना नाही होणार या योजनेचा लाभ

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम व अटी ठेवलेले आहेत परंतु अनेक महिला या योजनेच्या नियमाचे पालन न करता या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेत आहे अशा महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यासाठी सरकारने योजनेची ई -केवासी प्रक्रिया महिलांना पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

हे पण वाचा : नोव्हेंबर आणि डिसेंबर चे पैसे मिळाले नाही ? लगेच करा हे काम जमा होतील 4500 रुपये

आता सरकारकडे अशा सर्व महिलांची माहिती प्राप्त झाली आहे त्यामध्ये अनेक महिला या योजनेच्या निकषात बसत नाही असे स्पष्ट झालेले आहेत त्यामध्ये अनेक महिलांच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे काही महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीवर व आयकर दाता आहे तर काही महिला ही इतरआर्थिक योजनेच्या लाभार्थी आहे अशा सर्व महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.

Ladki Bahin Offline eKYC DocumentClick Here
Ladki Bahin eKYC Offline 2026 Click Here

2 thoughts on “Ladki Bahin Yojana : आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजनेत महिलांना लवकरच मिळणार 2100 रुपये, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा”

Leave a Comment