Lek Ladki Yojana Maharashtra 2026 : महाराष्ट्र सरकारने गरीब आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील मुलींना शिक्षण आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी आर्थिक मदत करण्यासाठी लेक लाडकी योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू केली आहे महाराष्ट्र सरकारकडून 1 ऑगस्ट 2017 ला अशाच प्रकारचे माजी कन्या भाग्यश्री ही योजना चालू होती परंतु या योजनेला मिळणारा अपुरा प्रसाद पाहून महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे .
लेक लाडकी योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबांमध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर त्या मुलींच्या पालनपोषणासाठी व त्या मुलींच्या शिक्षणासाठी टप्प्याटप्प्याने योजनेतून एक लाख एक हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते या योजनेसाठी 1 एप्रिल 2023 नंतर जन्म घेतलेल्या मुली पात्र असतील मुलीच्या जन्मानंतर पालकांना मुलीच्या वतीने अर्ज सादर करावे लागेल तर आज आपण लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा या संदर्भात सविस्तर माहिती पुढे आपण पाहणार आहोत
Lek Ladki Yojana 2026 – Overview
| योजनेचे नाव | लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2026 |
| योजनेची सुरुवात | 2023 |
| राज्य | महाराष्ट्र |
| योजनेच्या लाभार्थी | 1 एप्रिल 2023 नंतर जन्म घेतलेल्या मुली |
| आर्थिक मदत | एक लाख एक हजार रुपये |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन व ऑफलाइन |
| लेक लाडकी बहीण योजनेची वेबसाईट | https://lly.mhicds.com/ |
| हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक | 181 |
About Lek Ladki Yojana 2026
महाराष्ट्र सरकारने 30 ऑक्टोबर 2023 ला मुलीचा जन्मदर वाढवण्यासाठी व शिक्षणाला चालना देण्यासाठी लेक लाडकी योजना सुरू केली या योजनेसाठी महाराष्ट्रातील 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतरच जन्मलेल्या मुली पात्र असतील व त्यांना जन्मापासून 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत सरकारकडून एक लाख एक हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते.
ही योजना गरीब कुटुंबातील मुलीच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी मुलींना पाच हप्त्यांमध्ये योजनेचा लाभ सरकारकडून दिला जातो मुलीचा जन्म झाल्याबरोबर माता-पितांना या योजनेसाठी अर्ज सादर करावा लागतो अर्ज केल्यानंतर पहिला हप्ता थेट लाभार्थी पालकांच्या खात्यात डीबीटी मार्फत पाच हजार रुपये जमा केली जाते.
दुसरा हप्ताह मुलगी इयत्ता पहिली प्रवेश केल्यानंतर सहा हजार रुपये मिळते त्याचप्रमाणे तिसरा हफ्ता हा मुलगी इयत्ता सहावी प्रवेश केल्यानंतर सात हजार रुपये दिले जाते त्याचप्रमांणे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र हप्ते मिळण्या अगोदर सादर करावे लागतील या योजनेअंतर्गत चौथा हप्ता मुलगी येता 11 मध्ये प्रवेश केल्यानंतर 8 हजार रुपये दिले जाते व शेवटचा हप्ता म्हणजे पाचवा हप्ता मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 7500 रुपये इतकी रक्कम लाभार्थी मुलीच्या खात्यात थेट जमा केली जाते.
लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
महाराष्ट्र राज्यातील लेक लडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांकडे आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.
- अधिवास प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- केसरी किंवा पिवळ्या रंगाची राशन कार्ड
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- कुटुंब नियोजन प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- मुलीचे आधार कार्ड
- अर्जदारांची पासपोर्ट साईज फोटो
लेक लाडकी योजनेची पात्रता
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या माता पितांना योजनेचे पात्रता निकष पूर्ण करावे लागतात जर मुलीचे माता पिता या योजनेचे निकष पूर्ण करत नसतील तर त्यांचा अर्ज मंजूर केला जात नाही तर त्यासाठी सरकारने काय निकष लावलेले आहेत त्याची माहिती खालील प्रमाणे.
- अर्जदार कुटुंब हे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावे
- या योजनेसाठी 1 एप्रिल 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या मुली पात्र आहेत
- पिवळ्या किंवा केशरी रंगाचे राशन कार्ड धारक कुटुंब या योजनेसाठी पात्र असणार
- एका कुटुंबातील दोन मुलीला लाभ देण्यात येईल
- लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे
- अर्जदार कुटुंबांना वेळोवेळी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करावे लागेल
लेक लाडकी योजनेचे उद्देश
लेक लाडकी योजना मुलीच्या जन्मापासून ते अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत मुलीच्या कुटुंबाला आर्थिक आधार देते आणि मुलींना शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देते या योजनेचा लाभ सरकारकडून डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जातो या योजनेचे उद्देश मुलीचे जन्मदर वाढवणे आणि मुलींना सशक्त करणे हे आहे.
योजनेतून मिळणारी आर्थिक मदत
लेक लाडकी योजनेअंतर्गत आर्थिक मदत कशाप्रकारे दिली जाते त्याची विवरण खाली प्रमाण आहे.
| योजनेचा हप्ता | कधी मिळतो | किती निधी मिळतो |
| पहिला हप्ता | मुलीच्या जन्मानंतर | 5,000 रुपये |
| दुसरा हप्ता | मुलगी येता पहिली प्रवेश केल्यानंतर | 6,000 रुपये |
| तिसरा हफ्ता | मुलगी इयत्ता सहावीत प्रवेश केल्यानंतर | 7,000 रुपये |
| चौथा हप्ता | मुलगी अकरावी मध्ये प्रवेश केल्यानंतर | 8,000 रुपये |
| पाच हप्ता | मुलगी जेव्हा अठरा वर्षे पूर्ण होते तेव्हा | 75,000 रुपये |
| एकूण आर्थिक मदत : | 101000 रुपये |
लेक लाडकी योजनेची अधिकृत वेबसाईट
महाराष्ट्र सरकार कडून लेक लाडकी योजनेची अधिकृत वेबसाईट https://lly.mhicds.com/ ही प्रसिद्ध करण्यात आली आहे परंतु अर्जदार कुटुंब या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करू शकत नाहीत ही वेबसाईट फक्त महिला व बाल विकास विभागातील कर्मचारी वापर करू शकतात.
हे पण वाचा : लाडकी बहीण योजेनसाठी अशा पद्धतीने करा अर्ज आणि मिळवा ₹1500 महिना, पहा संपूर्ण प्रक्रिया
लेक लाडकी योजनेची अर्ज प्रक्रिया
महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाला अर्ज करण्याची ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा यासंदर्भात खाली माहिती दिलेली आहे त्यानुसार अर्जदार कुटुंब या योजनेसाठी अर्ज करू शकते.
- अर्ज करण्यासाठी सर्वात पहिले जवळच्या अंगणवाडी केंद्रात भेट द्यावी लागेल
- अंगणवाडी सेविकेमार्फत लेक लाडकी योजनेचा अर्ज घ्यायचा आहे
- अंगणवाडी सेविकांनी दिलेला अर्ज अचूक पद्धतीने भरून घ्यायचा आहे
- अर्ज अचूक पद्धतीने भरल्यानंतर
- आवश्यक सर्व कागदपत्रे सोबत जोडायचे आहेत
- त्यानंतर अर्ज अंगणवाडी सेविकेजवळ सादर करायचा आहे
- अर्ज सादर केल्यानंतर अंगणवाडी सेविकेद्वारा अर्ज ऑनलाईन केले जाईल
- अर्ज ऑनलाइन केल्यानंतर तुम्हाला त्याचा पावती दिली जाईल ती तुम्हाला सुरक्षित ठेवायची आहे.
अशा प्रकारे तुम्ही लेक लाडकी योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.
Lek Ladki Yojana Online Apply 2026
महाराष्ट्र सरकारकडून लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली नाही जर मुलीच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घ्यास असेल तर त्यांनी ऑफलाइन पद्धतीने या योजनेसाठी जवळच्या अंगणवाडी सेविकेजवळ जाऊन अर्ज सादर करावे लागेल.
लेक लाडकी योजनेचा फॉर्म 2026
महाराष्ट्र सरकारकडून लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे त्यासाठी मुलीच्या कुटुंबांना निर्देश दिलेले आहेत त्यासाठी शासनाकडून अधिकृत लेक लाडकी योजनेचा फॉर्म्स प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्याच्या मदतीने मुलीचे कुटुंब या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

| File Name | Lek Ladki Yojana Application From PDF 2026 |
| Size | 428kb |
| Download Link | Click Here |
लेक लाडकी योजनेचा शासन निर्णय
महाराष्ट्र सरकार कडून लेक लाडकी योजना संदर्भात वेळोवेळी शासन निर्णय जारी करण्यात येतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने सादर केलेले निर्देशची या योजनेच्या लाभ घेत असणाऱ्या कुटुंबांना माहीत असणे आवश्यक आहे तर ते शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी आम्ही खाली तुम्हाला लिंक उपलब्ध करून दिलेली आहेत.

| File Name | लेक लाडकी योजनेचा शासन निर्णय – 202310301153280030 |
| Size | 428kb |
| Download Link | Click Here |
FAQ- Lek Ladki Yojana Maharashtra 2026
लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज जवळच्या अंगणवाडी सेविकडे सादर करावे लागेल
लेक लाडकी योजनेसाठी कोणत्या मुली पात्र आहेत
महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुली या योजनेसाठी पात्र आहेत
लेक लाडकी योजनेअंतर्गत आर्थिक मदत किती मिळते
लेक लाडकी योजनेअंतर्गत एकूण रक्कम मुलीला एक लाख एक हजार रुपये दिले जाते
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.

2 thoughts on “Lek Ladki Yojana 2026 : लेक लाडकी योजनेचा लाभ घ्या, 1 लाख रुपये मिळवा, अशा प्रकारे करा अर्ज ?”