Ladki Bahin Yojana January Hafta 2026 : मोठी बातमी! तब्बल 86 लाख महिलांना अपात्र, डिसेंबर 2025 चा आकडा आला समोर

Ladki Bahin Yojana January Hafta 2026 News In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे या योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या तब्बल 86 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत डिसेंबर 2025 चा हप्ता फक्त 1 कोटी 60 लाख महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे यामुळे लाडक्या बहिणीमध्ये चिंतेचे वातावरण तयार झालेले आहे अशातच पुढील काही दिवसांमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे अशा महिलांना जानेवारी महिन्याचा हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागणार का ? तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

86 लाख महिला अपात्र ! नेमकं काय कारण?

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान एकूण 1 कोटी 40 लाख असल्याची नोंद झाली होती. मात्र पडताळणी केल्यानंतर 86 लाख महिला अपात्र घोषित करण्यात आलेल्या आहेत यामध्ये ई -केवायसी अपूर्ण असणे, ई -केवायसी मध्ये चुकीचा पर्याय निवडने आणि पात्रता निकषाचे उल्लंघन करून लाभ घेत असल्याचे समोर आले त्यामुळे अंतिम यादीमध्ये फक्त 1 कोटी 60 लाख महिला पात्र ठरल्या आहेत

अशा महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार का ?

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अशा अनेक लाभार्थी आहेत ज्यांनी ई केवायसी केलीच नाही त्याचप्रमाणे काही महिलांनी ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला त्यामुळे अशा महिलांना नोव्हेंबर पासून चे पैसे मिळणे बंद झाले आहे अशातच महाराष्ट्र सरकारकडून जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात लवकरच जमा केला जाणार आहे

परंतु अशा महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ई केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्या महिलांनी आपली ई केवायसी मध्ये दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण केली आहे त्या महिलांना जानेवारी महिन्याच्या हप्त्यात पैसे जमा केले जाणार अशी माहिती समोर येत आहे

Ladki Bahin Yojana January Hafta 2026
Ladki Bahin Yojana January Hafta 2026

परंतु ज्या महिलांनी अद्याप ई केवायसी केलीच नाही अशा महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नव्हत्या परंतु या योजनेअंतर्गत लाभ घेत होत्या त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.

या तारखेपर्यंत जमा होणार जानेवारी महिन्याचा हप्ता

महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशातच सरकारने जानेवारी महिन्याचा लाभ वितरण करण्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे आणि या संदर्भात जीआर पण प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात पुढील चार-पाच दिवसाच्या आत जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana e-KYC 2026Click Here
Ladki Bahin eKYC Approval List 2026 Click Here
Ladki Bahin New GR 2026 Download LinkClick here

Leave a Comment