Ladki Bahin February Installment 2026 : जानेवारी महिन्याचा हप्ता थेट खात्यात येणार, पण 80 लाख महिलां लाभापासून वंचित, जाणून घ्या पूर्ण माहिती

Ladki Bahin February Installment 2026 Update News In Marathi : महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना सध्या मोठा चर्चेचा विषय ठरलेली आहे सरकारने या योजनेचा लाभ गरजू महिलांनाच मिळावा याकरिता ई -केवायसी पडताळणी सुरू केली होती त्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2025 शेवटची तारीख दिली होती

त्या पडताळणी दरम्यान या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 80 लाख इतकी घटलेली आहे अशातच सरकारने जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यासंदर्भात निधी मंजूर केलेली आहे तरी या 80 लाख महिला लाभापासून वंचित राहणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin February Installment 2026 – Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2026
योजनेची28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
योजनेची लाभार्थीमहिला
आर्थिक मदत1500 रुपये महिना
वयोमर्यादा21 ते 65 वर्ष
लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर181

लाभार्थी संख्येत घट , कारण काय?

मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2.4 कोटी महिला लाभ घेत असल्याची नोंद झाली होती पण डिसेंबर 2025 मध्ये ही संख्या 1.6 कोटी पर्यंतच राहिली आहे 31 डिसेंबर 2025 पर्यंत 1.9 कोटी महिलांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती त्यामध्ये 1.6 कोटी महिलांनी अचूक पद्धतीने ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यामुळे काही महिन्या पासून 80 लाख महिला या योजनेच्या लाभांपासून वंचित आहेत.

एक प्रश्न आणि मोठा गोंधळ

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी करणे सरकारने अनिवार्य केले होते महिलांना ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण करतेवेळी काही पर्याय निवडायचा होता त्यामध्ये तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत नाही ना हा प्रश्न अनेक महिलांसाठी गोंधळाचा ठरला आणि काही महिलांनी चुकीने हो उत्तर दिल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्या महिला अपात्र ठरल्या

आणि त्यामुळे त्यांना नोव्हेंबर व डिसेंबर पासून चे पैसे मिळणे बंद झाले अशा लाभार्थ्यांसाठी सरकारने पुन्हा एकदा संधी दिली आहे 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने ई -केवायसी मध्ये त्या महिला दुरुस्ती करू शकतात.

जानेवारी हप्त्याचा निधी मंजूर

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जानेवारी हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशाच सरकारकडून 18 फरवरी 2026 रोजी 98.45 कोटीचा निधी या योजनेसाठी मंजूर केलेला आहे त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता ( Ladki Bahin February Installment 2026 ) महिलांच्या खात्यात लवकरच जमा केला जाणार आहे.

पैसे खात्यात कधी पर्यंत येणार ?

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी 98.45 कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे आणि याबाबत जीआर पण प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर आता महिलांच्या खात्यात कधीपर्यंत जानेवारी महिन्याचा आपला जमा होणारा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

Ladki Bahin February Installment 2026
Ladki Bahin February Installment 2026

दरवेळी प्रमाणे महाराष्ट्र सरकारकडून निधी मंजुरीचा जीआर प्रसिद्ध केल्यानंतर पुढील तीन ते चार दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली जाते त्यामुळे महिलांच्या खात्यात पण पुढील तीन-चार दिवसाच्या आत पैसे जमा होण्यास सुरुवात होईल अशी शक्यत आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांनी ई -केवायसीमध्ये दुरुस्तीपूर्ण केली आहेत त्यांना पण जानेवारी महिन्यामध्ये पैसे मिळणार असल्याची माहिती माहिती समोर येत आहे.

Ladki Bahin Yojana e-KYC 2026Click Here
Ladki Bahin eKYC Approval List 2026 Click Here

FAQ- Ladki Bahin February Installment 2026

ई – केवायसी न केलेल्या महिलांना जानेवारी हप्त्या मध्ये पैसे मिळणार .

ई – केवायसी न केलेल्या महिलांना जानेवारी चा हप्ता मिळण्याची शक्यता नाही अशा सरकारच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल

ई – केवायसी दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण केल्यास सर्व पैसे मिळणार का ?

हो

Leave a Comment