Ladki Bahin eKYC New Update In Marathi : महाराष्ट्र सरकारची सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार गरीब कुटुंबातील महिलांना पंधराशे रुपये आर्थिक मदत प्रत्येक महिन्याला देत आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 पर्यंतचे सर्व पैसे महिलांच्या आधारलींक बँक खात्यात जमा केले आहेत.
त्याचप्रमाणे राज्यांमध्ये अशा लाखो महिला आहेत ज्यांनी ई -केवायसी मध्ये चुकीचा पर्याय निवडला त्यामुळे त्यांना नोव्हेंबर पासून पैसे मिळणे बंद झाले आता त्या महिलांसाठी पुन्हा एकदा सरकारने ई -केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे परंतु ई -केवायसी केलीच नाही त्या महिलांचे काय ? यासंदर्भात ( Ladki Bahin eKYC New Update ) आज आपण सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
लाडकी बहीण योजनेची eKYC दुरुस्ती प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतलेला आहे ज्या महिलांनी ई -केवायसी करतानी चुकीचा पर्याय निवडला होता आणि त्यामुळे त्यांना नोव्हेंबर पासून हाप्ते मिळणे बंद झाले होते अशा महिलांसाठी पुन्हा एकदा सरकारने ई -केवायसी मध्ये दुरुस्ती करायची संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी महिलांना लाडकी बहीण योजनांच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ई -केवायसी करावी लागेल त्यानंतर त्या महिलांना या योजने अंतर्गत महिलाना लाभ मिळेल सुरू होईल.
जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार
महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक मतदान प्रक्रियेच्या अगोदर महिलांच्या खात्यात जमा केली जाणार अशी माहिती समोर येत होती परंतु अद्याप महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाले नाही आता जिल्हा परिषद व पंचायत समितीची मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे
त्यामुळे आता महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सरकारकडून केली जाणार आहे.

अजून eKYC नाही केली? त्या महिलांचं काय होणार
राज्यांमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अद्याप ई -केवायसी केलीच नाही अशा महिलांसाठी सरकारने ई -केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर ( https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ) उपलब्ध करून दिलेली आहे
परंतु ज्या महिलांनी ई – केवायसी केलीच नाही त्या महिलांचे काय होणार यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अशा महिलांनी जवळच्या अंगणवाडी सेवेकडे करून आवश्यक सर्व कागदपत्रे सहित ऑफलाइन पद्धतीने आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
Ladki Bahin eKYC 2026 – Important Link
| Majhi Ladki Bahin Yojana e-KYC Online 2026 | Click Here |
| Ladki Bahin Yojana eKYC List 2026 | Click Here |
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.
