Ladki Bahin Yojana e KYC Online 2026 : लाडकी बहीण योजनेची ई – केवासी दुरस्ती प्रक्रिया सुरू, महिलांना शेवटची संधी @ ladki bahin.maharashtra.gov.in

Ladki Bahin Yojana e KYC online 2026 : महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना राज्य सरकार प्रति महिना 1500 रुपये देत आहे आतापर्यंत सरकारने डिसेंबर 2025 पर्यंतचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत परंतु राज्यांमध्ये अशा लाखो महिला आहेत ज्यांनी e KYC करतानी काही चुका केल्या आणि त्यांना नोव्हेंबर पासून चा लाभ मिळणे बंद झाले

अशा महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणतीही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी ऑनलाईन ई केवायसी प्रक्रिया सुरू केलेली आहे तर आज आपण कशाप्रकारे ऑनलाईन e KYC प्रक्रिया करता येईल आणि काय आहे नवीन प्रक्रिया या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin Yojana – Overview 2026

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2026
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
योजनेची लाभार्थी2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे महिला
आर्थिक मदत1500 रुपये महिना
वय मर्यादा21 ते 65 वर्ष
अर्ज प्रक्रियाऑनलाइन व ऑफलाइन
लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन टोल फ्री नंबर181

About Ladki Bahin Yojana Online e KYC 2026

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केलेली आहे या योजनेचे लाभ महिला घेऊन आपल्या परिवाराचा योग्यरित्या सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकार ने ही योजना सुरू केली आहे

आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत परंतु राज्यात अशा अनेक महिला आहेत ज्यांनी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन e KYC प्रक्रिया करताना काही चुका केलेल्याआहेत त्याचप्रमाणे काही महिलांनी सरकारने ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये एकेवायसी प्रक्रिया केलेली नाही

अशा महिलांना नोव्हेंबर पासून चे पैसे मिळणे बंद झाले आहे या बाबीवर सरकारने लक्ष देऊन पुन्हा एकदा ऑनलाईन e KYC प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि याबाबत सरकारने अधिकृत जीआर पण काढलेला आहे.

Ladki Bahin Yojana e KYC Document

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन e KYC प्रक्रिया 6 फरवरी 2026 पासून सुरू केलेली आहे आणि ही महिलांना शेवटची संधी आहे त्यामुळे e KYC करताना काय कागदपत्र लागतील याबाबत आपण थोडक्यात खाली पाहणार आहोत.

  • महिलांचे स्वतःचे आधार कार्ड
  • वडील किंवा पतीचे आधार कार्ड
  • महिला विधवा असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
  • महिलाच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक
  • वडील किंवा पतीच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक

Ladki Bahin Yojana Online e KYC 2026

राज्यातील लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन e KYC मध्ये चुकीचा पर्याय निवडला होता त्यामुळे त्यांना नोव्हेंबर पासून पैसे मिळणे बंद झाले सध्या अशाच महिलांसाठी सरकारने चूक दुरुस्त करण्याची संधी दिलेली आहे
त्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजनेचे अधिकृत पोर्टल मार्फत ऑनलाइन e KYC प्रक्रिया सुरू केलेली आहे तर आता आपण कशाप्रकारे e KYC करू शकतो याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया खाली दिलेली आहे.

  • सर्वात पहिले महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ( ladakibahin.maharashtra.gov.in ) भेट द्यावी लागेल
  • वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर e KYC करण्यासाठी एक पॉप-अप दिसेल
    त्यावर क्लिक करायचं आहे
Ladki Bahin Yojana e KYC Online 2026
Ladki Bahin Yojana e KYC Online 2026
  • आता तुमच्यासमोर पुन्हा e KYC चा एकदा फॉर्म ओपन होईल
Ladki Bahin Yojana e KYC Online 2026
Ladki Bahin Yojana e KYC Online 2026
  • लाभार्थी महिलांचा आधार नंबर टाकायचा आहे
  • त्यानंतर कॅपचे फील करून ओटीपी पाठवा ह्या पर्यावर क्लिक करायचं आहे
  • महिलांच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येणार तो ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्यावे
Ladki Bahin Yojana e KYC Online 2026
Ladki Bahin Yojana e KYC Online 2026
  • ओटीपी वेरिफाय केल्यानंतर पर्याय निवडण्याची माहिती तुम्हाला दिसेल
Ladki Bahin Yojana e KYC Online 2026
Ladki Bahin Yojana e KYC Online 2026
  • त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे वाचून पर्याय निवडायचा आहे
  • योग्य पर्याय निवडल्यानंतर सबमिट करा या पर्याय क्लिक करायचा आहे
Ladki Bahin Yojana e KYC Online
Ladki Bahin Yojana e KYC Online

अशाप्रकारे तुम्ही ई केवायसी प्रक्रियेमध्ये झालेली चूक पुन्हा दुरुस्त करू शकता परंतु महिलांनी घाई गडबड न करता अचूक पद्धतीने पर्याय निवडावे.

नवीन लाभार्थ्यांसाठी e KYC कधी सुरू होणार

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी सुरुवातीला e KYC करताना चुकीचा पर्याय निवडला होता अशा महिलांना आपली चूक दुरुस्त करण्यासाठी लाडकी बहीण योजनेचे अधिकृत पोर्टल सुरू केलेले आहे परंतु ज्या महिलांनी अद्याप e KYC पूर्ण केलीच नाही अशा महिलांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ? या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महिलांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविक संपर्क साधून आपले कागदपत्र सादर करावे e KYC पूर्ण पूर्ण करून घ्यावे.

Ladki Bahin Yojana e KYC Online 2026 Last Date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी सरकारने खूप मोठा दिलासा दिलेला आहे सुरुवातीला सरकारने ऑफलाइन पद्धतीने ई -केवायसी करण्याची शेवटची संधी मिळाली होती परंतु अनेक अंगणवाडी सेविका कडून महिलांना

प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे महिलांना अडचणीचा सामना करावा लागत होता ही बाब सरकारने लक्षात घेऊन महिलांसाठी पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने ई -केवायसी प्रक्रिया पोर्टलवर सुरू केली आहे त्याचप्रमाणे महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत ई – केवायसी करण्याची सरकारने संधी दिली आहे.

Majhi Ladki Bahin Yojana e-KYC OnlineClick Here
Ladki Bahin Yojana 2026 – Online ApplyClick Here
Ladki Bahin Yojana Offline e-KYC 2026Click Here

FAQ- Ladki Bahin Yojana e KYC Online 2026

ऑनलाईन e KYC मध्ये दुरुस्ती करण्यासाठी शेवटची तारीख ?

31 मार्च 2026

नवीन लाभार्थ्यांसाठी e KYC कधी सुरू होणार

अशा महिलांनी ऑफलाइन पद्धतीने जवळच्या अंगणवाडी सेवेक संपर्क करून एक e KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी सरकारने अद्याप ऑनलाईन पद्धतीने नवीन लाभार्थ्याची प्रक्रिया सुरू केली नाही.

4 thoughts on “Ladki Bahin Yojana e KYC Online 2026 : लाडकी बहीण योजनेची ई – केवासी दुरस्ती प्रक्रिया सुरू, महिलांना शेवटची संधी @ ladki bahin.maharashtra.gov.in”

Leave a Comment