Ladki Bahin Yojana eKYC List 2026 : नोव्हेंबर पासून लाभ थकीत महिलांनाची यादी जाहीर, लगेच पहा तुमचा काय आहे प्रॉब्लेम

Ladki Bahin Yojana ekyc List News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय लाडकी बहिण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 1500 रुपये महिना दिला जात आहे आतापर्यंत सरकारने डिसेंबर 2025 पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत परंतु अशा अनेक महिला ज्यांना नोव्हेंबर पासून या योजनेअंतर्गत लाभ मिळणे बंद झालेले आहे

अशा सर्व महिलांची यादी आता महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे तर यादीमध्ये नाव कशाप्रकारे पाहता येईल व यादी कुठे उपलब्ध आहे ? जेणेकरून महिलांना यादीत नाव तपासून झालेली चूक दुरुस्त करण्यास सोपे होईल तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin Yojana 2026 – Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
योजनेच्या शुभारंभ28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीमहिला
आर्थिक मदतपंधराशे रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन /ऑफलाइन
Ladki Bahin Yojana Official Website LinkClick Here
हेल्पलाइन नंबर181

About Ladki Bahin Yojana eKYC List

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभ फक्त गरजू महिलांना मिळावा आणि ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत त्या महिलांना या योजनेतून अपात्र करावे या उद्देशाने सरकारने या योजनेच्या लाभ घेत असणाऱ्या महिलांना eKYC करणे अनिवार्य करण्यात आले होते त्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2025 शेवटची तारीख दिली होती

परंतु अनेक महिलांनी eKYC केली नाही त्याचप्रमाणे काही महिलांनी eKYC करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला अशा काही कारणामुळे अनेक महिलांना नोव्हेंबर पासूनचे हप्ते मिळणे बंद झालेले आहे करीता अशा सर्व महिलांची यादी आता सरकारकडून जाहीर करण्यात आलेले आहे.

लाभ थकीत महिलांनाची यादीत असे पहा नाव

महाराष्ट्र सरकारकडून ज्या महिलांना नोव्हेंबर पासून लाभ मिळणे बंद झालेले आहे अशा सर्व महिलांना पुन्हा एकदा eKYC करण्याची संधी दिली आहे अशा सर्व महिलांची यादी महाराष्ट्र सरकारकडून अंगणवाडी सेविका यांच्याकडे उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी महिलांनी आपले यादीमध्ये नाव पाहण्यासाठी जवळच्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क करावा किंवा तालुकास्तरीय महिला व बालविकास विभागाशी संपर्क करावा त्यामध्ये आपले नाव तपासून eKYC पूर्ण करून घ्यावे

Ladki Bahin Yojana eKYC List 2026
Ladki Bahin Yojana eKYC List 2026

Ladki Bahin Yojana eKYC Offline

महाराष्ट्र सरकारने ज्या महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अद्याप eKYC केली नाही त्याचप्रमाणे ज्या महिलांनी eKYC करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला अशा महिलांना सरकारने पुन्हा एक शेवटचे संधी दिलेली आहे महिलांनी जवळच्या अंगणवाडी सेवेकशी संपर्क करून ऑफलाइन पद्धतीने सर्व कागदपत्रे सादर करून eKYC पूर्ण करून घ्यावे.

Majhi Ladki Bahin Yojana e-KYC OnlineClick Here
Ladki Bahin Yojana 2026 – Online ApplyClick Here
Ladki Bahin Yojana Offline e-KYC 2026Click Here

FAQ- Ladki Bahin Yojana eKYC List 2026

जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार ?

जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात 12 जानेवारी 2026 पासून जमा होणार अशी माहिती समोर येत आहे परंतु अद्याप सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही

ऑफलाइन eKYC केल्यास सर्व पैसे मिळणार का ?

हो, महिलांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका संपर्क करून ऑफलाइन पद्धतीने eKYC प्रक्रिया पूर्ण केल्यास त्यांना या योजनेअंतर्गत पुन्हा लाभ मिळणार