Ladki Bahin Yojana 2026 : लाडकी बहीण योजेनसाठी अशा पद्धतीने करा अर्ज आणि मिळवा ₹1500 महिना, पहा संपूर्ण प्रक्रिया

Ladki Bahin Yojana 2026 Online Apply Process In Marathi : महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली आणि राज्यातील कोटीविधी महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 1500 महिला देण्यास सुरुवात झाली या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केले.

तर आज आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना कशा प्रकारे अर्ज करावा लागेल या योजनेचे निकष काय आहेत तसेच या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे अशा प्रकारची सर्व माहिती आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत.

Ladki Bahin Yojana 2026 – Overview

योजनेचे पूर्ण नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
योजनेची लाभार्थीगरीब कुटुंबातील महिला
आर्थिक मदत1500 रुपये महिना
वय मर्यादा21 ते 65 वर्ष
अर्ज प्रक्रियाऑनलाइन व ऑफलाइन
योजनेची अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन व तक्रार क्रमांक181

About Ladki Bahin Yojana 2026

महाराष्ट्र राज्यामधील सर्वात चर्चेत व लोकप्रिय असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी सुरू केली या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सरकार 1500 महिना देऊ लागले या योजनेच्या मदतीने महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठे यश प्राप्त झाले.

या योजनेचे लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा योग्य प्रकारे सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केली आहे त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये महिना एवजी 2100 रुपये महिना देऊ असे महायुतीच्या नेत्यांकडून आश्वासन पण दिलेला आहे त्यामुळे ही योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी खूप महत्त्वाचे ठरली आहे.

Ladki Bahin Yojana Document

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेजवळ आवश्यक सर्व कागदपत्रे असणे अनिवार्य आहे त्याची माहिती खालील प्रमाणे आहे .

  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड
  • आधार लिंक बँक पासबुक
  • मतदान कार्ड, शाळा सोडण्याचा दाखला, जन्मदाखला इतर कोणतीही एक पंधरा वर्षे पूर्वीचा रहिवासी पुरावा सादर करावा लागेल
  • उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळ्या व केसरी रंगाचे राशन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • हमीपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो

Ladki Bahin Yojana Eligibility

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता ठेवलेल्या आहेत ज्या महिला या योजनेच्या पात्रतेला पूर्ण करतील त्याच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

  • महिलाही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे
  • महिलाच्या कुटुंबाची एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे
  • महिला किंवा महिलाच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीवर नसावा
  • महिला इतर आर्थिक योजनेची लाभार्थी नसावी
  • महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नसावा
  • महिलांच्या कुटुंबाच्या सदस्याच्या नावे ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन नसावे

Ladki Bahin Yojana Official Website

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली त्यासाठी सरकारने अधिकृत वेबसाईट ( https://ladakibahin.maharashtra.gov.in ) लॉन्च केली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून महिला अर्ज करून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Ladki Bahin Yojana 2026 Online Apply

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज कशा प्रकारे करायचा त्याचे यांची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • सर्वात पहिले महिलांना या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
  • वेबसाईटवर भेट दिल्यानंतर वेबसाईटचा होम पेज तुमच्यासमोर ओपन होईल
  • आता तुम्हाला अर्जदार लॉगिन या पर्यावर क्लिक करायचा आहे
  • आता तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होईल
Ladki Bahin Yojana 2026 Online Apply
Ladki Bahin Yojana 2026 Online Apply
  • जर तुम्ही अगोदरच या वेबसाईटवर आपले अकाउंट तयार केले आहे
  • तर तुम्हाला युजर आयडी पासवर्ड इंटर करून लॉगिन करून घ्यायचा आहे
  • जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची आहे त्यासाठी Create Account ? या पर्यावर क्लिक करायचं आहे
  • आता तुमच्यासमोर Sign up फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला आवश्यक सर्व माहिती आधार कार्ड प्रमाणे भरायची आहे
Ladki Bahin Yojana 2026 Online Apply
Ladki Bahin Yojana 2026 Online Apply
  • त्यानंतर तुम्हाला Sign up या पर्यावर क्लिक करायचा आहे.
  • आता तुम्हाला पुन्हा एकदा लॉगिन पेजवर याच आहे आणि तुम्ही तयार केलेली यूजर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यायचा आहे
  • लॉगिन केल्यानंतर आता तुम्हाला Application of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana पर्यावर क्लिक करायचा आहे
  • आता तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे
  • आधार व्हेरिफाय केल्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचा फॉर्म ओपन होईल
Ladki Bahin Yojana 2026 Online Apply
Ladki Bahin Yojana 2026 Online Apply
  • फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून घ्यावी
  • माहिती अचूक पद्धतीने भरल्यानंतर आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करावे लागतील
Ladki Bahin Yojana Online Apply
Ladki Bahin Yojana Online Apply
  • सर्व माहिती व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आता तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे.

अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन घरबसल्या अर्ज सादर करू शकता परंतु सध्या या योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बंद आहे परंतु सरकारकडून लवकरच या योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते .

Ladki Bahin Yojana eKYC Process 2026

राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्या महिला या योजनेच्या निकषाचे पाल न करता लाभ घेत आहे या संदर्भात विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत होत्या त्यामुळे सरकारने या योजनेच्या लाभ घेत असलेल्या महिलांना ई – केवायसी करणे अनिवार्य केलेले होती.

त्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख ठेवली होती परंतु आता ऑनलाइन ई – केवायसी करण्याची मुदत संपलेली आहे त्यामुळे महिलांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविक संपर्क करून ऑफलाइन पद्धतीने ई – केवायसी पूर्ण करायचे आहे.

Ladki Bahin Yojana e-KYC Offline 2026 –Click Here
Ladki Bahin Offline eKYC Document –Click Here
Ladki Bahin Yojana eKYC Problem List 2026 –Click Here
Ladki Bahin Yojana e-KYC Edit –Click Here

FAQ- Ladki Bahin Yojana 2026

लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार ?

लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होण्यासंदर्भात सरकारकडून अद्याप कुठलीच माहिती देण्यात आली नाही परंतु भविष्यात या योजनेची नवीन आज प्रक्रिया सुरू होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

लाडकी बहीण योजनेची ऑफलाइन ई – केवायसी करण्याची शेवटची तारीख ?

महाराष्ट्र सरकारकडून अद्याप लाडकी बहीण योजनेची ऑफलाईन ई – केवायसी करण्याची शेवटची तारीख जाहीर करण्यात आली नाही परंतु महिलांनी लवकरात लवकर आपली ई – केवायसी पूर्ण करून घ्यावी.