Ladki Bahin Yojana December Hafta : उर्वरित महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, नवीन माहिती आली समोर

Ladki Bahin Yojana December Hafta News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील सर्वात चर्चेत असलेली व लोकप्रिय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून सरकार गरीब परिवारातील महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये देत आहे आतापर्यंत सरकारने डिसेंबर 2025 चेपर्यंतचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत.

परंतु अशा अनेक लाखो महिला आहेत ज्यांनी लाडकी बहीण योजनेची eKYC प्रक्रिया पूर्ण केली तरी पण त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणे बंद झालेले आहेत अशा महिलांसाठी सरकारने 20 जानेवारी 2026 रोजी डिसेंबर हप्ता वितरित करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचा जीआर जाहीर करण्यात आला आहे .

परंतु सहा दिवस पूर्ण होता अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले नाही तर सरकार कधीपर्यंत उर्वरित महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणार या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

उर्वरित महिलांसाठी नवीन निधी मंजूर

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ गरजू महिलांना मिळावा यासाठी सरकारने या योजनेची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे पात्र महिलांसाठी अनिवार्य केलेले होते 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत दिलेली होती त्या कालावधीमध्ये अनेक महिलांनी योग्य पद्धतीने आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली

परंतु त्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या खात्यात लाभ जमा झाले नाही अशा महिलांसाठी सरकारने 20 जानेवारी 2026 रोजी नवीन निधीची तरतूद केलेली आहे आणि या संदर्भात जीआर पण सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार

महाराष्ट्र सरकारने 20 जानेवारी 2026 रोजी उर्वरित महिलांना डिसेंबर चा हप्ता देण्यासाठी निधीची तरतूद केली आहे परंतु अद्याप आतापर्यंत सरकारने महिलांच्या खात्यात लाभ वितरित केलेला नाही.

Ladki Bahin Yojana December Hafta
Ladki Bahin Yojana December Hafta

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानाच्या अगोदर म्हणजे फरवरी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात निधी वितरित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु अद्याप सरकारने याबाबत कुठलीच घोषणा केली नाही करिता महिलांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल.

Majhi Ladki Bahin Yojana e-KYC OnlineClick Here
Ladki Bahin Yojana e-KYC Offline 2026Click Here
Majhi Ladki Bahin Yojana e-KYC EditClick Here

FAQ – Ladki Bahin Yojana December Hafta

नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार का ?

20 जानेवारी 2026 रोजी सरकारने उर्वरित महिलांना डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठी नवीन निधीची तरतूद केली आहे त्यामध्ये फक्त डिसेंबर महिन्याचा लाभ महिलांना देण्यात येणार असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहेत त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा पण हप्ता डिसेंबर महिन्याच्या हप्त्या मध्ये मिळेल का ? या संदर्भात अद्याप कुठलीच माहिती सरकारकडून देण्यात आली नाही.

ऑफलाइन eKYC करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

लाडकी बहीण योजनेची ऑफलाइन eKYC करण्याची महाराष्ट्र सरकारकडून अद्याप शेवटची तारीख जाहीर करण्यात आली नाही.

Leave a Comment