Majhi Ladki Bahin Yojana 2026 – Registration, Online Apply, eKYC, Status Check, Benefits and Eligibility

Majhi Ladki Bahin Yojana 2026 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हि योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी 28 जून 2024 रोजी सुरू केलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती त्या कालावधीमध्ये जवळपास 2.5 कोटी पेक्षा अधिक महिलांनी अर्ज सादर केलाल्या त्यामधील पात्र महिलांना या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिना सरकारकडून मिळण्यास सुरुवात झाली आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत जानेवारी 2026 पर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana 2026- Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
योजनेचे लाभार्थीआर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिला
आर्थिक मदत1500 रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन व ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीखसमाप्त
लाडकी बहीण योजनेची वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर181

माजी लाडकी बहीण योजनेचे उद्देश

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्याचप्रमाणे गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये व त्या महिला आपल्या कुटुंबाचा योग्य प्रकारे सांभाळ करून आर्थिक दृष्ट्या स्वतंत्रता मिळावी या उद्देशाने सरकारने हि योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत.

महिलांना आर्थिक मदत

₹1500 रुपये प्रति महिना तर वर्षाला ₹18,000 रुपये महिलेच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

Majhi Ladki Bahin Yojana 2025 – Installment Dates

Installment Date / Amount
19th Installment (जानेवारी हफ्ता)
(Released)
23 फेब्रुवारी 2026 (जानेवारी हफ्ता)
₹ 1500
18th Installment (डिसेंबर हफ्ता)
(Released)
14 जानेवारी 2026 (डिसेंबर हफ्ता)
₹ 1500
17th Installment (नोव्हेंबर हफ्ता)
(Released)
31 डिसेंबर 2025 (नोव्हेंबर हफ्ता)
₹ 1500
16th Installment (ऑक्टोबर हफ्ता)
(Released)
04 नोव्हेंबर 2025 (ऑक्टोबर हफ्ता)
₹ 1500
15th Installment (सप्टेंबर हफ्ता)
(Released)
10 ऑक्टोबर 2025 (सप्टेंबर हफ्ता)
₹ 1500
14th Installment (ऑगस्ट हफ्ता)
(Released)
11 सप्टेंबर 2025 (ऑगस्ट हफ्ता)
₹ 1500
13th Installment (जुलै हफ्ता)
(Released)
06 ऑगस्ट 2025 (जुलै हफ्ता)
₹ 1500
12th Installment (जून हफ्ता)
(Released)
07 जुलै 2025 (जून हफ्ता)
₹ 1500
11th Installment (मे हफ्ता)
(Released)
05 जून 2025 (मे हफ्ता)
₹ 1500
10th Installment (एप्रिल हफ्ता)
(Released)
03 मे 2025 (एप्रिल हफ्ता)
₹ 1500
8th Installment (फेब्रुवारी हफ्ता)9th Installment (मार्च हफ्ता)(Released)08 मार्च 2025 (फेब्रुवारी हफ्ता)12 मार्च 2025 (मार्च हफ्ता)(दोन महिन्यांचा हप्ता फेब्रुवारी/मार्च)
₹ 3000
7th Installment (जानेवारी हफ्ता)
(Released)
25 जानेवारी 2025 (जानेवारी हफ्ता)
₹ 1500
6th Installment (डिसेंबर हफ्ता)
(Released)
25 डिसेंबर 2024 (डिसेंबर हफ्ता)
₹ 1500
4th Installment (ऑक्टोबर हफ्ता)5th Installment (नोव्हेंबर हफ्ता)(Released)04 ऑक्टोबर 2024(दोन महिन्यांचा हप्ता ऑक्टोबर/नोव्हेंबर)
₹ 3000
3rd Installment (सप्टेंबर हफ्ता)
(Released)
25 ते 30 सप्टेंबर 2024
₹ 1500 / ₹ 4500
1st Installment (जुलै हफ्ता)2nd Installment (ऑगस्ट हफ्ता)
(Released)
14 ते 17 ऑगस्ट 2024(दोन महिन्यांचा हप्ता जुलै/ऑगस्ट)
₹ 3000

MaJhi Ladki Bahin Yojana 2024 – Installment Dates

InstallmentDate / Amount
17th Installment (नोव्हेंबर हफ्ता)
(Released)
31 डिसेंबर 2025 (नोव्हेंबर हफ्ता)
₹ 1500
16th Installment (ऑक्टोबर हफ्ता)
(Released)
04 नोव्हेंबर 2025 (ऑक्टोबर हफ्ता)
₹ 1500
15th Installment (सप्टेंबर हफ्ता)
(Released)
10 ऑक्टोबर 2025 (सप्टेंबर हफ्ता)
₹ 1500
14th Installment (ऑगस्ट हफ्ता)
(Released)
11 सप्टेंबर 2025 (ऑगस्ट हफ्ता)
₹ 1500
13th Installment (जुलै हफ्ता)
(Released)
06 ऑगस्ट 2025 (जुलै हफ्ता)
₹ 1500
12th Installment (जून हफ्ता)
(Released)
07 जुलै 2025 (जून हफ्ता)
₹ 1500
11th Installment (मे हफ्ता)
(Released)
05 जून 2025 (मे हफ्ता)
₹ 1500
10th Installment (एप्रिल हफ्ता)
(Released)
03 मे 2025 (एप्रिल हफ्ता)
₹ 1500
8th Installment (फेब्रुवारी हफ्ता)9th Installment (मार्च हफ्ता)(Released)08 मार्च 2025 / 12 मार्च 2025(दोन महिन्यांचा हप्ता फेब्रुवारी/मार्च)
₹ 3000
7th Installment (जानेवारी हफ्ता)
(Released)
25 जानेवारी 2025 (जानेवारी हफ्ता)
₹ 1500

लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

अधिवास प्रमाणपत्र : अधिवास प्रमाणपत्र प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/ 15 वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक सादर करावे.
महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास : पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक सादर करावे.
आधार कार्ड : अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव व माहिती सादर करावी.
वार्षिक उत्पन्न : महिलांच्या कुटुंबाची एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तसेच पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
बँक पासबुक : लाभार्थी महिलांचे स्वतःचे आधार लिंक बँक पासबुक असणे आवश्यक आहे
हमीपत्र व फोटो : लाभार्थी महिलेचे स्वतःचे फोटो व हमीपत्र सादर करावे

माझी लाडकी बहीण योजनेची पात्रता

अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 वयोगटातील असावे
विवाहित, विधवा, घटस्फोटीत तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला योजनेसाठी पात्र असणार
अर्जदार महिलेच्या कुटुंबातील एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे
अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी

माझी लाडकी बहीण योजनेची अपात्रता

अर्जदार महिलेच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नसावा
अर्जदार कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय कर्मचारी नसावी
अर्जदार महिला इतर शासनाच्या आर्थिक योजनेची लाभार्थी नसावी
अर्जदार महिलांच्या कुटुंबाच्या सदस्यांची नावे चार चाकी वाहन नसावे ( ट्रॅक्टर वगळून )

Ladki Bahin Yojana 2026 – Online Apply

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना शासनाच्या अधिकृत वेबसाईटचे माध्यमातून अर्ज करावा लागेल त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • सर्वात पहिले महिलांना शासनाच्या अधिकृत ( https://ladakibahin.maharashtra.gov.in ) वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
Ladki Bahin Yojana 2026
Ladki Bahin Yojana 2026
  • आता तुमच्यासमोर वेबसाईटचा होम पेज ओपन होईल
  • त्यामध्ये तुम्हाला अर्जदार लॉगिन या पर्यावर क्लिक करायचं आहे
Ladki Bahin Yojana 2026
Ladki Bahin Yojana 2026
  • आता तुमच्यासमोर Login पेज ओपन होणार
  • तुम्हाला तुमचे युजर आयडी पासवर्ड तयार करावा लागेल
  • त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या Create Account ? ह्या पर्यावर क्लिक करायचं आहे
  • आता तुम्हाला तुमची व्यक्तिगत आधार प्रमाणे माहिती Sign up फॉर्म मध्ये भरायचे आहे
Ladki Bahin Yojana 2026
Ladki Bahin Yojana 2026
  • माहिती अचूक पद्धतीने भरल्यानंतर सबमिट करून घ्यायचा आहे.
  • यूजर आयडी पासवर्ड तयार केल्यानंतर तुम्हाला लॉगिन करून घ्यायचा आहे
  • आता तुम्हाला Application For Majhi Ladki Bahin Yojana या पर्यायावर क्लिक करायचं आहे
  • तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ओपन होईल
Ladki Bahin Yojana 2026
Ladki Bahin Yojana 2026
  • त्यामध्ये मागितलेली सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून घ्यावी
  • माहिती अचूक पद्धतीने भरल्यानंतर आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावे
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana
  • माहिती व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे

अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता परंतु अर्ज करण्याची कालावधी समाप्त झाली असल्या कारणामुळे आता या योजनेची ऑनलाईन व ऑफलाईनअर्ज प्रक्रिया बंद आहे त्यामुळे सरकारकडून जेव्हा ह्या योजनेची ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल तेव्हा ह्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिली जाईल.

Ladki Bahin Yojana eKYC Offline 2026

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने मध्ये अशा अनेक महिलाआहेत जे महिला या योजनेच्या निकषाचे पाल न करता या लाभ घेत आहे अशा संदर्भात महिला व बालविकास विभागाकडे तक्रारी प्राप्त होत्या त्यामुळे या योजनेचा लाभ गरजू महिलांना मिळावा यासाठी सरकारने महिलांना ई – केवायसी करणे बंधनकारक केले होते
त्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2025 हे शेवटची तारीख ठेवली होती
परंतु अनेक महिलांनी आपली ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्याचप्रमाणे काही महिलांनी ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला होता त्यामुळे अशा सर्व महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणे बंद झाले सरकारने या बाबीवर लक्ष दिले आणि ऑफलाइन पद्धतीने ई केवायसी प्रक्रिया सुरू केलेली आहे त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे

  • सर्वात पहिले महिलांना आवश्यक सर्व कागदपत्रे तयार करायचे आहे
  • त्यानंतर महिलांना जवळच्या अंगणवाडी सेविकेची संपर्क करायचा आहे
  • अंगणवाडी सेविकेजवळ आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करायचे आहे
  • तसेच तुम्ही जे चूक केली आहे या संदर्भात माहिती द्यायची आहे
  • त्याचप्रमाणे जर तुम्ही ई -केवायसी केली नाही आहे त्याची पण माहिती द्यायची आहे
  • ही प्रक्रिया तुम्ही केल्यानंतर अंगणवाडी सेविके मार्फत तुमच्या कागदपत्राची पडताळणी केली जाणार
  • जर तुम्ही या योजनेच्या निकषात बसत असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत पुन्हा लाभ मिळणार
  • अशाप्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने तुमची ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.
Majhi Ladki Bahin Yojana e-KYC Online Click Here
Ladki Bahin Yojana 2026 – Online ApplyClick Here
Ladki Bahin Yojana Offline e-KYC 2026Click Her